बससेवा पुर्वपदावर

धुळे आगारारातून रोज 347 फेर्‍या, 20 लाखांचे उत्पन्न
बससेवा पुर्वपदावर

धुळे Dhule। प्रतिनिधी

एसटीचे शासनात विलिनीकरण (Merger of ST into government) करावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचार्र्‍यांनी राज्यभर (strike by employees) बंद पुकारला होता. त्यामुळे बससेवा ठप्प झाली होती. आता बस सेवा (Bus service) पूर्वपदावर आली आहे. धुळे आगारातून दररोज 347 फेर्‍या होत आहे. रोजच्या 50 हजार कि.मी.च्या प्रवासातून धुळे आगाराला 20 लाख रूपयांचे उत्पन्न (income) मिळत असल्याची माहिती आगार प्रमुख अनुजा दुसाने यांनी दिली.

राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र
राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यातील एस.टी. कर्मचार्‍यांनी 28 नोव्हेंबरपासून बेमुदत संप (strike) पुकारला होता. हा संप मिटावा व एस.टी.सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी शासनाने कर्मचार्र्‍यांच्या विविध मागण्या सोडविल्या. परंतू शासकीय सेवेत विलिनीकरणाच्या (Merger into government service) मागणीवर कर्मचारी ठाम होते. त्यामुळे त्यांनी संप सुरूच ठेवला होता. अखेर या मागणीसाठी आयोग स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने (Court) दिला. त्यानुसार आयोगाची स्थापना (Establishment of Commission) करण्यात आली.

त्यानंतर या आयोगाने देखील एस.टी.कर्मचार्र्‍यांच्या (employees) शासकीय सेवेतील विलिनीकरणाला नकार दिला. तसा अहवाल त्यांनी न्यायालयात सादर केला. न्यायालयाने देखील आयोगाच्या अहवालाची दखल घेवून कर्मचार्र्‍यांना (employees) कामावर हजर होण्याचे आदेश दिले. अखेर एस.टी. कर्मचारीही 24 एप्रिलपासून कामावर हजर झाले.

कर्मचार्‍याचा संप सुरू होण्यापूर्वी धुळे आगारातून दररोज 340 च्या आसपास बस फेर्या होत होत्या. आता हळुहळु बस सेवा पूर्वपदावर (Bus service preceded) आली आहे. आता धुळे आगारातून रोज 347 फेर्‍या होत आहे. 50 हजार कि.मी.च्या प्रवासातून धुळे आगाराला 20 लाख रूपयांचे उत्पन्न मिळत आहे.

दरम्यान धुळे आगारातून पुण्यासाठी दररोज 11 फेर्या होत असून नाशिकसाठी 19 बसेस सोडल्या जात आहेत. धुळ्यातून सुरत, वापी, अहमदाबादसाठीही बसेस नियमित सोडल्या जात आहे. याबरोबरच धुळे-खुंटामोडी ही बस सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान धुळे आगारातून पुण्यासाठी दररोज 11 फेर्या होत असून नाशिकसाठी 19 बसेस सोडल्या जात आहेत. धुळ्यातून सुरत, वापी, अहमदाबादसाठीही बसेस नियमित सोडल्या जात आहे. याबरोबरच धुळे-खुंटामोडी ही बस सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com