कल्पतरू सोसायटीतील घरफोडीचा चोवीस तासांच्या आत उलगडा

मुद्देमाल हस्तगत, चाळीसगा रोड पोलिसांची कामगिरी
कल्पतरू सोसायटीतील घरफोडीचा चोवीस तासांच्या आत उलगडा

धुळे - dhule

येथील शहरातील कल्पतरू सोसायटीतील (Kalpataru Society) घरफोडीची २४ तासाच्या आतच उकल करण्यास चाळीसगाव रोड पोलिसांना (police) यश आले. पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून त्यांच्याकडून दुचाकीसह ६० हजारांचा मुद्येमाल हस्तगत केला आहे.

शहरातील आग्रा रोडवरील हॉटेल शेरेपंजाब जवळ राहणारे श्रेष्ठ शंकरलाल अग्रवाल यांच्या कल्पतरू सोसायटीतील जुन्या घरी काल पहाटे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. घरातून रोख २ हजार इलेक्ट्री शेगडी, मिक्सस असा एकुण १० हजारांचा मुद्येमाल लंपास केला. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्या नोंद करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असतांना चाळीसगावरोड चौफुली येथे एक इसम हातात काहीतरी वस्तू लपवून फिरत असल्याची गुप्त माहिती सपोनि संदीप पाटील यांना मिळाली.त्यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना त्या ठिकाणी पाठविले असता एक इसम संशयितरित्या हातात मिक्सर घेवून फिरताना दिसला. त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव इर्शाद खान असे सांगितले. चौकशीत त्याने कल्पतरु सोसायटीतील घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून इलेक्ट्रीक शेगडी, मिक्सर, दोन हजार रूपयांची रोकड, पन्नास रूपये किंमीतची लोखंडी टॉमी व गुन्ह्यात वापरलेली ५० हजाराची दुचाकी असा एकूण ६० हजार ५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संदीप पाटील, पोसई. नासिर पठाण, पोसई. विनोद पवार, पोसई. ज्ञानदेव काळे, असई. दीपक पाटील, पोहवा. पंकज चव्हाण, संदीप पाटील, पोना. बी.आय. पाटील, पोकॉ. चेतन झोळेकर, स्वप्निल सोनवणे, इंद्रजित वैराट, शरद जाधव, चालक कुलदिप महाजन, पोकॉ.विशाल मोहीने यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com