धुळ्यात माजी सैनिकाकडे घरफोडी, दोन ठिकाणी प्रयत्न

धुळ्यात माजी सैनिकाकडे घरफोडी, दोन ठिकाणी प्रयत्न

धुळे ।Dhule प्रतिनिधी

शहरातील साक्री रोड परिसरातील डमा गार्डन मागे असलेल्या विनय कॉलनी येथे चोरट्यांनी माजी सैनिकाकडे (Ex-serviceman) घरफोडी (Burglary) करत रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा लाखोंचा मुद्येमाल लंपास (Mudyamal Lampas) केला. तसेच अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला.

विनय कॉलनीतील प्लॉट नं. 23 मध्ये माजीसैनिक अशोक नारायण माळी हे राहतात. ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून तीन तोळे सोन्याची मंगलपोत, 15 ग्रॅमचे कानातले, एक लाख रुपये रोख असा ऐवज चोरून केला. त्यानंतर चोरट्यांनी प्लॉट नं.33 राहणारे बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र जगताप यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला. तसेच दादाश्री बंगला प्लॉट नंबर 10 येथील राजेंद्र प्रभाकर गवते येथील भाडेकरूच्या घरात देखील चोरीचा प्रयत्न झाला आहे. याबाबत धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com