मेव्हुण्याचा महिलेवर चाकु हल्ला : भितीने गळफास घेत आत्महत्या

 मेव्हुण्याचा महिलेवर चाकु हल्ला : भितीने गळफास घेत आत्महत्या
Sandip Tirthpurikar

धुळे | dhule| प्रतिनिधी

शहरातील साक्री रोडवरील कुमार नगरात आज दुपारी महिलेवर (woman) मेहुण्याने (brother-in-law) चाकु हल्ला (knife attack) केला. त्यात महिलेला जबर दुखापत झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला असावा, या भितीतून मेहुण्याने घरी जावून गळफास (hanging himself) घेत आत्महत्या (suicide) केली. महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  

प्राची दिनेश खेमाने (वय ३३ रा. कुमार नगर, साक्री रोड, धुळे) असे जखमी महिलेचे नाव आहे. आज दि. २२ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मेहुणा हरिष माखिजा याने काहीतरी कारणावरून तिच्या चेहेर्‍यावर व गळ्यावर चाकुने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. हल्लानंतर मेहुणा पसार झाला. त्यानंतर तिला पती दिनेश खेमाने याच्यासह शेजार्‍यांनी खाजगी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ  उडाली. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच धुळे  शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी मेव्हुण्याचाही शोध सुरू केला. लोकेशनुसार पोलिस त्यांच्या घरी गेले असता मेहुणा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान चाकु हल्ला केल्यानंतर त्याने महिला मयत झाली असावी, या भितीने घरी जावून गळफास घेत आत्महत्या केली, असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  हरिष आसिजा असे मयत मेहुण्याचे नाव समोर येत आहे. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com