बोरदला या दिवशी होणार भोंगर्‍या बाजार

बोरदला या दिवशी होणार भोंगर्‍या बाजार

बोरद (Board) ता.तळोदा । वार्ताहर

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे (Corona) सण-उत्सव बंद असल्याने भोंगर्‍या बाजार (Bhongarya market) बंद करण्यात आला होता. मात्र यंदा बोरद येथे 16 मार्च व 17 मार्च हे दोन दिवस भोंगर्‍या बाजार भरणार आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी दरवर्षी भरत असतो दोन वर्षापासून भोंगर्‍या बाजार (Bhongarya market) बंद होता.यावर्षी भोंगर्‍या बाजार भरत असल्याने ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) जय्यत तयारी सुरू केलेली आहे. बाजारात साफसफाई सुरू केली तर संपूर्ण गावात लाईटची व पाण्याची व्यवस्था केलेली आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त चौख लावलेला आहे.

आरोग्याच्यादृष्टीने दवाखाना (Dispensary) 24 तास उघडा राहणार आहे. बोरद हे तालुक्यात सर्वात मोठे गाव असून गावाची लोकसंख्या 12 हजारा पेक्षा जास्त असुन या गावाशी 40 गावांचा संपर्क आहे. परिसरात शंभर टक्के आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. तळोद तालुक्यात फक्त बोरद येथेच भोंगर्‍या बाजार भरत असतो.

आदिवासी संस्कृतीचे (Tribal culture) दर्शन घडविणारे आदिवासी बंधूचा मुख्य सण म्हणजे होळी (Holi) होय. बाहेरगावी नोकरी निमित्ताने गेलेले आदिवासी बांधव आपल्या कुटुंबासहित आपल्या गावी येत असतात व होळीच्या निमित्ताने भोंगर्‍या बाजार भरत असतो. भोंगर्‍या बाजारात सर्व सातपुडा पर्वतात असलेले आदिवासी बांधव पारंपारिक पद्धतीने वेषभूषा परिधान करून आपल्या कुटुंबासहित ते ढोल-ताशांच्या तालावर बाजारात नाचत येत असतात. भोंगर्‍या बाजारात होळी व लागणारे महत्त्वाचे साहित्य गूळ, खजूर खोबरे, व हार कंगन खरेदी करीत असतात नंतर संसार उपयोगी बाजार करीत असतात

दोन वर्षापासून भोंगर्‍या बाजार बंद होता व या वर्षी भोंगर्‍या बाजार भरत असल्याने व्यावसायिकांची दुकान (Professional shop) मोठ्या प्रमाणात आले आहेत गूळ ,खजूर,खोबरे हार कंगण चे दुकाने मोठ्या प्रमाणात येत असतात. तसेच लहान मुलांची खेळणी असलेली दुकाने हॉटेल्स, पानटपरी, चांदीचे दुकान थाटलेले असतात बोरद येथील भोंगर्‍या बाजारात हजारो आदिवासी बांधव हजेरी लावत असतात यात भोंगर्‍या बाजारात (Bhongarya market) दोन दिवसात लाखो रुपयांची उलाढाल होत असते होळी पेटल्यानंतर होळी मातेचे दर्शन घेऊन ते आपापल्या गावी जात असतात. सातपुड्यातील आदिवासी तरुण-तरुणी नवनवीन आदिवासी संस्कृतीचे दर्शन (Tribal culture) घडवित भोंगर्‍या बाजारात येत असतात.या भोंगळ्या बाजारामुळे तालुक्यात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com