बोपखेलच्या लोकनियुक्त सरपंच अखेर पायउतार

अविश्वास ठरावाच्या बाजूने जनतेचा कौल, विजेत्यांनी केला जल्लोश
बोपखेलच्या लोकनियुक्त सरपंच अखेर पायउतार

पिंपळनेर । Pimpalner । वार्ताहर

साक्री तालुक्यातील बोपखेल ग्रामपंचायतीच्या (Bopkhel Gram Panchayat) लोकनियुक्त सरपंचाविरुध्द (Public Appointed Sarpanch) सदस्यांनी (members) यापूर्वी बहुमतात अविश्वास ठराव मंजूर (No-confidence motion passed) केला. मात्र आज यासंदर्भात पुन्हा जनतेतून झालेल्या मतदानात बोपखेल ग्रामस्थांचा कौल सरपंचाच्या विरोधात गेल्याने आता हे पद रिक्त झाले आहे.

लोकनियुक्त सरपंच सुमित्रा हाडक्या राऊत यांच्या विरुध्द ग्रामपंचायतीचच्या 9 पैकी 7 सदस्यांनी 30 जून 2022 रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. दि.6 जुलै रोजी बोपखेल ग्रामपंचायत येथे गट विकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यात लोकनियुक्त सरपंच सुमित्रा हाडक्या राऊत यांच्या विरुद्ध 7 सदस्यांनी दाखल केलेला प्रस्ताव मंजुर झाला.

या सदस्यांमध्ये पवार दीपक सुकम, कुवर रामचंद्र नथू, वळवी संजय बाबा, वळवी सुरवता डॅनियल, वळवी विलास मल्ल्या, कुवर जमनाबाई मगन, माळी अरुणा संजय यांचा समावेश आहे. यामुळे हे पद काही दिवसांपासून रिक्त होते.

गटविकास अधिकार्‍यांनी आज दि.29 रोजी सरपंच पदाबाबत गावकर्‍यांचे मतदान घेतले. यावेळी बोपखेल ग्रामस्थांचे मतही सुमित्रा राऊत यांच्या विरोधात गेले. यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने 479 मतदान झाले.

तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध 373 मतदान झाले. अविश्वासाच्या बाजून 96 मते जासत पडल्याने सुमित्रा राऊत यांना सरपंच पदावरुन पायउतार व्हावे लागले. गट विकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी विजेत्यांनी जल्लोष केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com