दोंडाईचात व्यावसायिकाकडे धाडसी घरफोडी

दोंडाईचात व्यावसायिकाकडे धाडसी घरफोडी

दोंडाईचा Dondaicha। श.प्र.

शहरासह परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून आज सकाळीही गजबजलेल्या शिवाजी नगरातील व्यावसायीकडे businessman धाडसी घरफोडी Burglary झाल्याचे समोर आले. चोरट्यांनी 1 लाख 31 हजारांची रोकड व 50 हजारांचे सोने-चांदीचे दागिने असा एकुण 1 लाख 81 हजाराचे ऐवज लंपास Loot lampas केला. याप्रकरणी पोलिसात police गुन्हा दाखल झाला आहे.

येथील शिवाजी नगरातील रहिवासी भुषण लोटन खारकर हे तीन दिवसांपासून धुळे येथे गेलेले होते. आज सकाळी शेजारी शहनाज खाटीक यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने संशय आला. त्यांनी घरात जावून पाहिले असता घरातील कपाट व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. याबाबत त्यांनी घरमालक भुषण लोटन खारकर यांना माहिती दिली. त्यांनी मित्र जितेंद्र जामराव काळे यांना घरी जावून चौकशी करण्यास सांगितले. तसेच स्वतः ही लागलीच दोंडाईचासाठी रवाना झाले. सकाळी नऊ वाजता घटनास्थळी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष लोले, उपनिरीक्षक देविदास पाटील यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच श्वान पथकाला पाचारण केले. जँकी नावाच्या श्वानने जवळपास फेरफटका मारला. यावेळी ठसे तज्ज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र राजपुत, पोना हिरालाल हरणे, धनंजय मोरे, मनोज ब्राम्हणे, के.एस.परदेशी,जी.बी.मंगळे, चालक जे.ऐ.पिंजारी आदी उपस्थित होते. याबाबत घरमालक भुषण खारकर यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील दाट वस्तीत असणार्‍या शिवाजी चौकात चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे तपासाचे आव्हान दिले आहे. दरम्यान शहरात दिवसाढवळ्या घडणार्‍या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. सामान्यमाणुन काबाड कष्ट करून पै-पै गोळा करतो. आणि चोर बिनधास्तपणे चोरी करून घेवू जात असल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com