
धुळे - प्रतिनिधी - Dhule
अक्कलपाडा धरणात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती साक्री पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून....
महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती व माजी उपनगराध्यक्ष विलास खोपडे यांचा मृतदेह आज सायंकाळी अक्कलपाडा धरणात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी अक्कलपाडा धरणात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती साक्री पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोध सुरु केला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.
मृतदेह विलास खोपडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. प्रथमदर्शी साक्री पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास साक्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख हे करीत आहेत.