धुळे Dhule। प्रतिनिधी
येथील कृषी महाविद्यालय (Agriculture College) येथे आज दि.1 रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Former Chief Minister Vasantrao Naik) यांच्या जयंती निमित्त दरवर्षी कृषी दिनाचे (Agriculture Day) आयोजन करण्यात येते. यंदा आयोजित रक्तदान शिबिरात (Blood donation camp) 50 विद्यर्थ्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांची हिमोग्लोबीन व रक्तगट चाचणीही करण्यात आली. आजपासून सुरु होणार्या कृषी सप्ताहात (Agriculture Week) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सहयोगी अधिष्ठाता डॉ.सी. डी. देवकर यांच्याहस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कृषिदिनाचे औचित्य साधून कृषी महाविद्यालय व रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड यांचे संयुक्त विद्यमाने हे रक्दान शिबीर घेण्यात आले यात 50 विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास रोटरी क्लब धुळे क्रॉसरोडचे श्रीकांत इंदाणी, आशिष अजमेरा, संजय शिंपी, दिनेश खांडेकर, राजेश जोशी, सचिन बोरसे, डॉ.सुशिल महाजन, सागर थोरात, पवन खानकरी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास कृषि महाविद्यालयातील अभियांत्रिकी विभागाचे प्रा.डॉ.एस.पी. सोनवणे, उद्यानविद्या विभागाचे प्रा.डॉ.सी.व्ही. पुजारी, कृषी विद्या विभागाचे प्रा.डॉ.पी.डी. सोनवणे, कृषी किटकशास्त्र विभाग प्रा.डॉ.जी.बी. काबरे, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रा.डॉ.पांडुरंग शेंडगे, प्रा.डॉ. सुनिल धर्मा पाटील कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना प्रा.डॉ.खुशाल बराटे बाजरी संशोधन योजना, प्राचार्य डॉ.आर.जे. देसले कृषी तंत्र विद्यालय, प्रा.डॉ.संदीप पाटील कृषी विस्तार विभाग, प्रा.डॉ.व्ही.एस. गिरासे कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, डॉ.व्ही.व्ही. भावसार कुलमंत्री विद्यार्थी वसतिगृह, डॉ.दिनेश नांद्रे कार्यक्रम अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र धुळे, प्रा.डॉ.विक्रांत भालेराव कृषी रसायनशास्त्र व मृदशास्त्र विभाग, वाय.बी. तायडे सहाय्यक कुलसचिव, डॉ.जितेंद्र सुर्यवंशी, विद्यार्थी कल्याण अधिकारी, प्रा.के.बी. पाटील, शारीरिक शिक्षण निदेशक व सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.सुनिल धर्मा पाटील, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, डॉ.जितेंद्र सुर्यवंशी, विद्यार्थी कल्याण अधिकारी, प्रा.के.बी. पाटील, शारीरिक शिक्षण निदेशक यांनी विशेष प्रयत्न केले.
कृषी महाविद्यालयात दरवर्षी कृषी दिनापासून सप्ताहाला सुरुवात होते. या कृषी सपताहात कृषी शास्त्राच्या विद्यार्थ्यांसोबतच शेतकर्यांना मार्गदर्शक ठरेल अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन ग्रामीण भागातील सहभाग वाढविण्यात येतो.