Photo धुळ्यात महाविकास आघाडीची जोरदार निदर्शने

आ.कुणाला पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको, आमदारांसह कार्यकर्त्यांना अटक
Photo धुळ्यात महाविकास आघाडीची जोरदार निदर्शने

धुळे - dhule

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपुर येथे शेतकऱ्यांना चिरडून ठार मारणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध आणि शेतकरी (Farmers) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज महा विकास आघाडीतर्फे जिह्लाबंदची हाक देण्यात आली. यानिमित्ताने काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष (MLA Kunal Patil) आमदार कुणाल पाटील यांच्यानेतृत्वाखाली महामार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शहरातही निदर्शने करण्यात आली. या वेळी आ. कुणाल पाटील यांच्या सह कार्यकर्यांना अटक करण्यात आली. धुळे शहरातील म गांधी पुतळा, चाळीसगाव चौफुली, नगाव चौफुली, कापडणे, कुसुंबा, मुकटी या ठिकाणी महामार्ग ठप्प करण्यात आला.

आंदोलनात आ.पाटील यांच्यासह माजी आ.प्रा.शरद पाटील, सेनेचे महेश मिस्त्री, किरण पाटील, रणजित भोसले, युवराज करणकाळ आदी उपस्थित होते.शहरातील मोराणे उपनगर येथे सुरत बायपास रस्तावर महाविकास आघाडी तर्फे आंदोलन झाले. यावेळी काँग्रेस चे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, डॉ.दत्ता परदेशी, बापु खैरनार, सुनिल ठाकरे, शिरीष सोनवणे, सोमनाथ बागुल, पोपट शिंदे, वसंत सुर्यवंशी, गुलाब सोनवणे, ऋषी ठाकरे, बापुजी हाके, संजु बोरसे, प्रल्हाद मराठे, गोटु पाटील, अविनाश शेलार, मयुर ठाकरे, चेतन सुर्यवंशी, राहुल खैरनार, आसाराम मोरे, चंद्रकांत खैरनार, किशोर वाघ, संजय पवार व शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.