घरगुती गॅसचा काळाबाजार, तिघांवर गुन्हा, सव्वालाखांचा मुद्येमाल जप्त

घरगुती गॅसचा काळाबाजार, तिघांवर गुन्हा, सव्वालाखांचा मुद्येमाल जप्त

धुळे । Dhule। प्रतिनिधी

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत (raid) वाहनांमध्ये घरगुती गॅसचा (gas) वापर करून काळाबाजार (Black market) करणार्‍यांवर कारवाई केली. सव्वा लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास एलसीबीच्या(Local Crime Branch) पथकाने शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल शरदच्या पाठीमागे असलेल्या बोळीत छापा (raid) टाकला. तेथून शहाबुद्दीन करीममुल्ला शाह (वय 48 रा. श्रीराम सॉमीलजवळ, मालेगाव रोड) व गोकुळ नाना पाटील (वय 25 रा. अवधान) या दोघांना पकडले. ते घरगुती गॅस (gas) सिलींडरमधून धोकेदायकपणे वाहनात (vehicle) गॅस भरत होते. तेथून चार गॅस सिलींडर, 12 हजारांची इले. मोटार, 5 हजारांचा इले. वजनकाटा व 50 हजारांची कार (क्र. एमएच 03 एएफ 4457) असा मुद्येमाल जप्त केला. याप्रकरणी पोेहेकाँ महेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीवरून दोघांवर आझादनगर पोलिसात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

तसेच साडेबारा वाजेच्या सुमारास लोकमान्य हॉस्पिटलच्या (Lokmanya Hospital) मागील बोळीत सार्वजनिक जागी गॅस सिलींडरचा काळाबाजार (Black market) करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. तेथून 34 हजारांचे 17 सिलींडर, 12 हजारांची गॅस भरण्यासाठी लागणारी इलेक्ट्रीक मोटार, 5 हजार रूपयांचा इलेक्ट्रीक वजन काटा असा एकुण 51 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. तसेच शरीम मुसा पिंजारी (वय 26 रा. हिदायत मशिद जवळ, पुर्व हुडको, धुळे) याला ताब्यात घेतले. तो बेकायदेरशीररित्या घरगुती गॅस सिलींडर मानवी जिवीतास धोका निर्माण होईल, अशी कृती करून विनापरवाना जवळ बाळगून होता. त्यांच्यावर पोहेकाँ प्रकाश सोनार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com