गावठी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणार्‍यासह दुचाकी चोरट्याला अटक

गावठी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणार्‍यासह दुचाकी चोरट्याला अटक

धुळे - प्रतिनिधी dhule

स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकाने काल दुहेरी कामगिरी केली. (shirpur) शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथे छापा टाकत गावठी कट्टासह जिवंत काडतूस बाळगणार्‍यास तर धुळ्यातील तिरंगा चौकातून दुचाकी (Two-wheeler) चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणार्‍यासह दुचाकी चोरट्याला अटक
धक्कादायक ; मुलाने केला वडीलांचा खून

बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्‍या व विक्री करणार्‍यांविरुद्ध दि.15 मेपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे पोलीस महासंचालकांचे आदेश आहेत. त्यानुसार पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कारवाई आदेश दिले आहेत. त्यानुसार अत्तरसिंग गुजा पावरा (रा.गोरक्षनाथ पाडा, हिसाळे, शिरपुर) हा त्याच्या राहत्या घरात अवैध्यरित्या अग्नीशस्त्र बाळगुन असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीचे पीआय हेमंत पाटील यांना काल मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पथकाने त्याचा अतरसिंग पावरा याचा शोध सुरू केला. तो राहत्या घरी असल्याची माहिती मिळाल्याने रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर छापा टाकला. पोलिसांची चाहुल लागताच अत्तरसिंग पावरा हा घराच्या पाठीमागील दरवाजातुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. त्याच्या घराची झडती घेतली असता गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस मिळून आल्या.

25 हजारांचा लाकडी मुठ असलेला गावठी कट्टा व पंधराशे रूपये किंमतीच्या तीन जिवंत काडतुस असा एकुण 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस शिपाईमहेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीवरुन अत्तरसिंग पावरावर थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी (Superintendent of Police Pravin Kumar Patil) पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav) यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय हेमंत पाटील, एपीआय प्रकाश पाटील, पीएसआय योगेश राऊत, हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, मयुर पाटील, तुषार पारधी, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन यांनी केली आहे.

तसेच अरुण वामन लोखंडे (वय 62 रा.गल्ली नं.4, धुळे) यांची घराजवळ लावलेली दुचाकी (क्र.एमएच 18 एजी 3730) दि. 9 ते 10 मे दरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केली.

याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा समांतर तपास एलसीबीकडुन सुरु असतांना हा गुन्हा तिरंगा चौकातील मिनहाज मोहम्मद रमजान अन्सारी याने केला असल्याची गोपनिय माहिती पीआय हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ प्रकाश सोनार, पोना योगेश चव्हाण, पोकॉ कमलेश सुर्यवंशी व राहुल गिरी यांच्या पथकाने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शहरातील तिरंगा चौकातून शिताफिने अन्सारी याला विना क्रमांकाच्या दुचाकीसह पकडले. त्यांच्याकडून 25 हजारांची दुचाकी जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने शिरपुर पिपल्स बँकेच्या मागच्या बोळीतुन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याला आझादनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Related Stories

No stories found.