आमोदे शिवारात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Accident
Accident

धुळे । dhule प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील निजामपुर- सरवड रस्त्यावरील आमोदे शिवारात भरधाव अज्ञात वाहनाने (vehicle) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीस्वार (Bike rider) तरुण ठार (killed) झाला. याप्रकरणी निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर रमेश भिल (वय 25 रा. म्हसाळे ता.साक्री) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो काल दि.18 मार्च रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास दराने रोहणे (ता.शिंदखेडा) येथून त्याच्या दुचाकीने (क्र. एमएच 17 बीएफ 7245) सरवड करून निजामपूर रोडने म्हसाळे येथे घरी येत होता. त्या दरम्यान त्याला आमोदे शिवारात राज खडी क्रेशर समोर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

त्यात गंभीर जखमी होऊन किशोर भिल याचा मृत्यू झाला. याबाबत श्रावण पंडित भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनावरील चालकावर निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com