वाईन शॉप चालकाला मारहाण करीत खंडणीची मागणी, तिघांवर गुन्हा

वाईन शॉप चालकाला मारहाण करीत खंडणीची मागणी, तिघांवर गुन्हा

धुळे । dhule । प्रतिनिधी

शहरातील साक्री रोडवरील वाईन शॉप चालकाला (wine shop operator) मारहाण करीत त्यांच्याकडे दर महिन्याला दहा हजार रूपये खंडणीची मागणी (Extortion by beating) करण्यात आली. काल रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी तिघांवर शहर पोलिसात गुन्हा (crime)दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धिरज रामेश्वर परदेशी (वय 31 रा. जळगाव जनता बँक कॉलनी, चाळीसगाव रोड,धुळे) या व्यापार्‍याने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचे साक्री रोडवरील यशवंत नगरात रिक्षा थांब्याजवळ के वाईन कॉनर नावाचे दुकान आहे. ते काल दि. 10 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास दुकान बंद करीत होते. त्यादरम्यान विक्की शेजवळ (रा.भिमनगर, साक्री रोड, धुळे), आकाश पानपाटील (रा. मोगलाई, रमापती चौक, धुळे) व गौरव इंगळे (रा.भिमनगर) हे तिघे दुचाकीवर दुकानात आले.

त्यांनी एक रॉयल स्टॅॅग कॉर्टर दे, असे सांगितले. तेव्हा धिरज परदेशी याने त्यांच्याकडे पैसाची मागणी केली. त्याचा राग येवून त्यांनी शिवीगाळ करीत, ओळखत नाही का, आम्ही या परिसराचे दादा आहे. आमच्या परीसरात दुकान चालू ठेवायचे असेल तर तुला आम्हाला रोज फुकट दारू द्यावी लागेल.

तसेच महिन्याला 10 हजार रूपये हफ्ता द्यावा लागेल. नाहीतर रोज दुकानात येवून नुकसान करू, अशी धमकी दिली. तसेच तिघांनी परदेशी यास हाताबुक्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून तिघांवर भादंवि कलम 384, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com