शिरपूर Shirpur। प्रतिनिधी
शिरपूरात क्रिकेट सामन्यांसाठी (cricket matches) अतिशय उच्च दर्जाच्या सोयीसुविधा (High quality amenities) पाहून भारावलो असून अनेक सुविधा पुरवून बीसीसीआयतर्फे (BCCI) सामन्यांचे आयोजन (host matches) करण्यात येणार असल्याची घोषणा (Announcement) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर (Maharashtra Cricket Association President Vikas Kakatkar) यांनी केली. प्रसंगी त्यांनी येथील क्रिकेट सामन्यांचे सुंदररीत्या केलेले आयोजन पाहून आनंद झाला. भूपेशभाई पटेल हे या यशस्वी स्पर्धा कार्यक्रमाचे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ व जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय एस. व्ही. के. एम. टी-20 महिला चॅम्पियन्स ट्रॉफी-2022 चा शानदार समारोप तांडे येथील मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूलच्या भव्य मैदानावर बुधवारी झाला. अनेक मान्यवरांच्या हस्ते विजेता, उपविजेता संघांसह गुणवंत संघ, उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेचा समारोप जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आ.राजवर्धन कदमबांडे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, जिल्हा क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा श्री विले पार्ले केळवाणी मंडळ सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, जि.प.चे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, एस.व्ही.के.एम. स्पोर्टस् चेअरमन नवीन शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी सौ. कृतीबेन भूपेशभाई पटेल, अनेक महिला पदाधिकारी, अॅड. कुंदन पवार, जिल्हा क्रिकेट उपाध्यक्ष लहू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्था सचिव प्रभाकरराव चव्हाण, बबनराव चौधरी, किशोर माळी, सीईओ डॉ. उमेश शर्मा, के. डी. पाटील, देवेंद्र पाटील, प्राचार्य पी.सुभाष, प्राचार्य दिनेश राणा विविध संस्था पदाधिकारी, तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
एस. जी. ग्रुप ऑफ कंपनी यू.पी. या विजेत्या संघाला 71 हजार रुपये रोख बक्षीस, चषक देवून गौरविण्यात आले. उपविजेता संघ जनादेश इंडिया, पुणे या संघाला 51 हजार रुपये रोख बक्षीस, चषक तसेच तिसरे स्थान राखणार्या केकेसीए बुलंदशहर उत्तर प्रदेश संघाला 31 हजार रुपये रोख बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.
एस. जी. ग्रुप ऑफ कंपनी यू.पी. व जनादेश भारत पुणे संघ यांच्यात अंतिम सामना 8 जून 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता दिवसरात्र खेळविण्यात आला. नाणेफेक जिंकून जनादेश भारत संघ पुणे यांनी गोलंदाजी स्विकारली. पहिल्या इनिंगमध्ये एस.जी. ग्रुप ऑफ कंपनी यू.पी. ने निर्धारित 20 षटकांत 183/7 धावा केल्या. प्रत्युत्तरात दुसर्या इनिंगमध्ये जनादेश भारत पुणे संघ 17.4 षटकात सर्वबाद 89 धावाच करु शकला. एस.जी. ग्रुप ऑफ कंपनी यू.पी. चा संघ 94 धावांनी जिंकला. सामनावीर पुरस्कार देवून अर्शी चौधरी या खेळाडूला गौरविण्यात आले. 5 सामन्यात 249 धावा करणार्या नेहा बडवाईक (कर्मवीर फायटर्स शिरपूर) हिला सर्वोत्कृष्ट फलंदाज, 6 सामन्यात 11 विकेट घेणार्या प्रिया कोकरे (जनादेश भारत संघ पुणे) हिला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक शरयू कुलकर्णी (जनादेश भारत संघ पुणे), सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक विनवी गुरव (एच.पी. रॉयल्स पुणे, 4 सामने 11 गडी बाद), स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्शी चौधरी (एस.जी. ग्रुप ऑफ कंपनी यू.पी., 4 सामन्यात 169 धावा व 5 सामन्यात 9 गडी बाद केले). तसेच नवीन शेट्टी यांनी 25,000 रुपये रोख बक्षीस दिले.
अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव म्हणाले, शिरपूर येथील सोयीसुविधा महाराष्ट्रात कुठेही नसेल अशी व्यवस्था पाहून भाईंचे खेळावरील प्रेम दिसून येते.
भूपेशभाई पटेल म्हणाले, स्पर्धेसाठी माजी आ. कमदबांडे यांचे सहकार्य लाभले. कोच, प्रशिक्षक, खेळाडू सर्वांनी खूप मेहनत केली. खेळाडूंनी स्पर्धेत चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. शिरपूर मध्ये मुलींसाठी क्रिकेट सामने नियमितपणे भरविण्यात येतील. संस्थेमार्फत तिन मैदाने उपलब्ध केले असून प्रत्येक मैदानावर 3 ते 5 पिचेस तयार केले आहेत. एस. व्ही. के. एम. कॅम्पस धुळे, शिरपूर येथे इनडोअर स्टेडियम काम सुरू आहे.
अॅड. कुंदन पवार म्हणाले, भूपेशभाई पटेल यांचे खूप मोठे व्हीजन आहे. तिन्ही मैदाने सुंदर व उपयुक्त आहेत. भाईंनी मोठे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केले असून बीसीसीआयचा सामना शिरपूर येथे खेळवावे, यासाठी एम.सी.ए. ने प्रयत्न करावे.
उत्कृष्ठ आयोजनाचे कौतूक
मान्यवरांसह उत्कृष्ट खेळाडू शतकवीर किरण बाडविक, पुणे येथील शतकवीर अर्शी चौधरी, आर.एस.के.टीम छत्तीसगड कोच, तरन्नूम पठाण (इरफान व युसूफ पठाण यांची भगिनी) यांनी उत्कृष्ट आयोजनाचे कौतूक होते. प्राचार्य पी. सुभाष यांनी शाळेबद्दल, संस्थेबद्दल माहिती दिली.
स्पर्धेसाठी यांचे लाभले सहकार्य
स्पर्धा 31 मे ते 8 जून पर्यंत नऊ दिवस घेण्यात आली. स्पर्धेसाठी राहुल दंदे, किरण आंचन, जिल्हा सचिव राजन चौक, स्वप्निल निकुंभे, देवा मोरे, अभय कचरे, संजय चौधरी, भालेराव माळी, अभय कचरे, पूजा जैन, मोहित जैन, संदिप देशमुख, राहुल स्वर्गे, अनिकेत मोरे, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, खेळाडू यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन वाहिद धुळे यांनी केले. सामन्यांची कॉमेंट्री पदमाकर पाटील (जळगाव) यांनी केले.