दोंडाईचात चोरट्यांची धुव्वाधार बॅटींग

एकाच रात्रीतून हॉटेलसह आठ ठिकाणी घरफोडी; पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह
दोंडाईचात चोरट्यांची धुव्वाधार बॅटींग

दोंडाईचा Dondaicha। श.प्र.

शहरात चोरट्यांनी कहर (Thieves wreak havoc) केला असून एकाच रात्रीतून आठ ठिकाणी धाडसी घरफोडी (Bold burglary) केली. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक (Inspector of Police) दुर्गेश तिवारी हे वास्तव्यास असलेल्या पटेल कॉलनीत चार ठिकाणी, धुळे बायपासवरील अजय पॅलेस हॉटेल, हुडको कॉलनी दोन तर हरचंद नगरात एका ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करत रोकड, दागिन्यांसह लाखोंचा मुद्येमाल लंपास (Millions of dollars) केला. या घटेनमुळे नागरिक भयभित झाले असून पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह (Question marks over police functioning) निर्माण केले जात आहे.

धुळे बायपासवरील रस्त्यावरील पिंटू महाजन यांच्या मालकीच्या अजय पॅलेस हॉटेलमधून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी टीव्ही, 32 हजारांंची रोकड, दारूच्या बाटल्या असे 72 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. तर पटेल कॉलनीत संजय पंडित पाटील यांच्या घरातून 40 हजार रोख व 23 ग्रॅम सोने चोरून नेले. काही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीही लागले नसून किरकोळ वस्तू चोरीस गेल्या आहेत

. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान शहरात दिवसेंदिवस चोर्‍या वाढत आहेत. त्यात यापुर्वी झालेल्या अनेक चोर्‍यांचा तपास शून्य आहे. चोरट्यांना पोलिसांची कुठलीही भिती उरलेली नाही.

इतक्या बिनधास्त ते चोरी करतात. घराला कुलूप लावले म्हणजे ते फुटतेच, म्हणून सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांची गस्त होते की नाही, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com