जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आजपासून जनजागृती

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आजपासून जनजागृती

धुळे - प्रतिनिधी dhule

जागतिक पातळीवर दि.२८ मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनाची संकल्पना "आम्ही कटीबध्द आहोत" ही आहे. या दिनाचे औचित्य साधून दि.२२ ते २८ मे या कालावधीत जिल्ह्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या (zp) पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी दिली आहे.

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आजपासून जनजागृती
देशदूत संवाद कट्टा : मासिक पाळी, आरोग्य अन् निसर्गाचे संवर्धन

स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.अश्विनीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत.

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आजपासून जनजागृती
देशदूत संवाद कट्टा : मासिक पाळी, आरोग्य अन् निसर्गाचे संवर्धन

यामध्ये आरोग्य विभाग, शिक्षण, महिला व बाल कल्याण विभाग, उमेद तसेच विविध घटकांचा समन्वय साधून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तरी सर्व ग्राम पंचायतीमधून आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, शिक्षिका, महिला बचत गट यांनी पुढाकार घेवून मोठया प्रमाणत या सप्ताह निमित्त मासिक पाळी व्यवस्थापन व आरोग्याची काळजी या विषयावर महिला व किशोरवयीन मुलींना माहिती देवून जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आजपासून जनजागृती
देशदूत संवाद कट्टा : मासिक पाळी, आरोग्य अन् निसर्गाचे संवर्धन
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com