उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यांना देणार पुरस्कार

सीईओ भुवनेश्वरी एस, जि.प. कर्मचार्‍यांचा समस्या, अडचणी घेतल्या जाणून
उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यांना देणार पुरस्कार

धुळे । dhule । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) कर्मचार्‍यांना येणार्‍या विविध समस्या, अडी-अडचणी आज सीईओ भुवनेस्वरी एस (CEO Bhuvaneswari S.) यांनी जाणून घेऊन त्याबाबत मार्गदर्शन केले. दरमहा उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पुरस्कार (Awards) देण्यात येईल, असेही जाहिर केले.

जि.प.च्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात आज मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेस्वरी एस (CEO Bhuvaneswari S.) यांनी विशेष बैठक घेतली. यावेळी अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास गांगुर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे, उमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे, जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एम.सोनवणे आदींसह खातेप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भुवनेस्वरी एस यांनी कर्मचार्‍यांना शासन नियमाप्रमाणे ड्रेसकोडनुसार, आयडी कार्डसह यावे, दैनंदिन केलेल्या कामाचा गोषवारा काढणे, सेम डे ला संदर्भ निकाली काढणे, हालचाल नोंदवहीत नोंद करणे, पेन्शन, लेखा परिक्षण मुद्दे अनुपालन, स्थानिक निधी लेखा परिक्षण अनुपालन, सीएम पोर्टल, निलंबीत कर्मचारी प्रकरणे, गोपनिय अहवाल यांचा आढावा देणे, दुसरा बुधवार तालुका व गाव स्तरावर अधिकारी कर्मचार्‍यांनी पाहणी करणे व तेथील समस्या तेथील शाळा, प्रा.आ.केंद्र, उपकेंद्र, पशुदवाखाना यांच्या दर्जाबाबत पाहणी करुन अहवाल सादर करणे, दरमहा उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पुरस्कार देण्यात येईल, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चा केली.

त्यानंतर कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर जि.प. लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वनराज पाटील यांनी सर्व कर्मचार्‍यांच्यावतीने आभार मानले. कारण गेल्या तीन ते चार वर्षापासून कर्मचार्‍यांना भेडसावणार्‍या अडी-अडचणी कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्नच केला गेला नाही, ही शोकांतिका असून आमचे दुर्दैव आहे. आपण आमच्या अडचणींची दखल घेत आहात याचा आम्हाला मनापासून आनंद झाला आहे. आपल्या व्हीजनला आमची साथ राहिल असेही ते म्हणाले.

वेगवेगळ्या विभागातील कर्मचार्‍यांना शासकीय कामांसाठी नाशिक, पुणे, मुंबई अथवा जिल्हा व तालुकास्तरावर जावे लागते. परंतू त्याचे प्रवासभत्ते बिले तरतूद अभावी अदा केली जात नाही. तर त्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com