शौचालय पाडून व्यापारी गाळे बांधण्याचा प्रयत्न

थाळनेर ग्रामपंयातीच्या कामावर ग्रामस्थांची नाराजी: महिलांची गैरसोय: चौकशीची मागणी
शौचालय पाडून व्यापारी गाळे बांधण्याचा प्रयत्न

थाळनेर Thalner। वार्ताहर

शिरपूर तालुक्यातील थाळनेर (Thalner) येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरातील महिला शौचालय (Women's toilet) ग्रामपंचायतमार्फत (gram panchayat) अचानक पाडण्यात (fall) आले. त्यामुळे महिलांची गैरसोय झाल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासन हगणदारी मुक्त (Haganadari free) बाबत जनजागृती करून ग्रामस्थांना वैयक्तिक शौचालय (toilet) बांधण्यासाठी प्रवृत्त करत आहे. त्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जाते व गाव हगणदारी मुक्त गावाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान या ठिकाणी बसथांबा असल्याने प्रवाशांसह शेतकरी, शेतमजुर व ग्रामस्थांची नेहमी वर्दळ असते. अशा मोक्याच्या ठिकाणी महिलांसाठी बांधण्यात आलेले शौचालय ग्रामपंचायतने पाडून त्या जागेवर व्यापारी गाळे (Merchant Slots) बांधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या परिसरातील मराठे गल्ली, दलित वस्ती, सोनार गल्ली या भागातील महिलांकडून या शौचालयाचा (toilet) वापर होत होता. मात्र ग्रा.पं. शौचालयच पाडल्यामुळे महिलांची मोठी गैरसाय झाली आहे. ग्रामपंचायतने महिलांसाठी वापरात येणारे शौचालय पाडण्या अगोदर नवीन शौचालय बांधून देणे आवश्यक होते. तसे न करता महिलांची गैरसोय केलेली आहे. याची सखोल चौकशी (Inquiry) करण्याची मागणी मोहन लोटन पाटील (Mohan Lotan Patil) यांनी जिल्हाधिकारी व शिरपूर पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com