स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

धुळे । Dhule प्रतिनिधी

तालुक्यातील नवलनगर (Navalnagar) येथील स्टेट बँकेचे (State Bank) एटीएम (ATM) फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. आज सकाळी ही खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांवर तालुका पोलिसात (police) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्टेट बँकेच्या नवलनगर शाखेचे व्यवस्थापक (Manager) मनिष विजय बोरसे (Manish Vijay Borse) (वय 39 रा. आनंद कॉलनी, अमळनेर) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आज पहाटे 1 ते 1.40 वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी स्टेट बँकेच्या (State Bank) एटीएमच्या शटरचे कुलप लावण्याचे हुक गॅस कटरने तोडले. त्यानंतर एटीएममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी एटीएम (ATM) मशिन गॅस कटरच्या सहाय्याने कट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले.

घटनेची माहिती कळताच अपर पोलिस अधिक्षक (Superintendent of Police) प्रशांत बच्छाव, (Prashant Bachhav) उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी तिघा अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवि 457, 380,511, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बी.आर.कोतेकर करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com