शिंदखेड्यातील एटीएम चोरीचा उलगडा ; हरियाणाची टोळी जेरबंद

एलसीबीच्या टिमचे पोलिस अधिक्षकांनी केले कौतूक
शिंदखेड्यातील एटीएम चोरीचा उलगडा ; हरियाणाची टोळी जेरबंद

धुळे | प्रतिनिधी dhule

शिंदखेडा शहरातील रहदारीच्या रस्त्यावरील (State Bank) स्टेट बँकेचे (atm) एटीएम फोडून सुमारे ३७ लाखांची रोकड लंपास करणार्‍या टोळीला (lcb) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

शिंदखेड्यातील एटीएम चोरीचा उलगडा ; हरियाणाची टोळी जेरबंद
जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी गुलाबराव देवकर तर व्हॉ.चेअरमन पदी श्यामकांत सोनवणे यांचे नाव निश्चित

टोळीतील चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन लाखांची रोकड, गुन्ह्यातील वाहनांसह ८ लाख ६० हजारांचा मुद्येमाल जप्त केला आहे.

याप्रकरणातील तिघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान एलसीबीने या टोळीला जेरबंद केल्याने (jalgaon) जळगाव जिल्ह्यातील दोन ते तीन एटीएम फुटण्यापासुन बचावले आहे. कारण या टोळीने पोलिसांच्या हाती लागण्याच्या काही दिवसापुर्वी रेकी केली होती. त्यामुळे एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत (Police Inspector Shivaji Budhwant) यांच्यासह त्यांच्या टिमचे जिल्हा पोलिस प्रमुख प्रविणकुमार पाटील (District Police Chief Pravin Kumar Patil) यांनी पत्रपरिषदेत कौतूक केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com