
धुळे - प्रतिनिधी dhule
(Sakri taluka) साक्री तालुक्यातील जैताणे येथे शेतीच्या वादातून सख्ख्या भावावर प्राणघातक (Attack) हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भावासह तिघांविरुध्द निजामपूर (police) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैताणे येथे राहणार्या विष्णू गुलाब बोरसे (वय ४९) आणि दादाभाई गुलाब बोरसे या दोघं भावांमध्ये शेतीचा वाद होता. त्यात मागील भांडणाची कुरापत काढून दि.७ मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जैताणे ग्रामपंचायतीजवळ दादाभाई गुलाब बोरसे,अर्जून दादाभाई बोरसे दोघे (रा.जैताणे ता.साक्री) आणि समाधान शंकर भामरे (रा.गोपालपुरा, दोंडाईचा) या तीघांनी लोखंडी पास आणि धारधार शस्त्राने हल्ला करुन विष्णू बोरसे यांना जखमी केले. तिघांवर भादंवि ३२६,३२४, ३२३, ३४१, ४१ प्रमाणे निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय शिरसाठ करीत आहेत.