साखरपुड्यात ‘वर’ मुलांसाठी ‘घोडा’ न आणण्याचा ठराव मंजूर

कोळी समाजाच्या मेळाव्यात 116 वधू-वरांनी दिला परिचय
साखरपुड्यात ‘वर’ मुलांसाठी ‘घोडा’ न आणण्याचा ठराव मंजूर

शिंदखेडा Shindkheda । प्रतिनिधी

तालुक्यातील पाटण येथे आशापुरी देवीच्या मंदिर परिसरात आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे (Tribal basket spider multipurpose charitable organization) वधू-वर व पालक परिचय मेळावा ()Meet the bride and groom and parents घेण्यात आला. त्यात साखरपुड्यात (Sakhapudya) ‘वर’ मुलांसाठी ‘घोडा’ न आणण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नारायण बागूल हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन अ‍ॅड, शरदचंद्र जाधव, तहसीलदार सुनिल सैदाणे, अनिल नन्नावरे, भारत ईशी, पावबा बागुल, छगन वाकडे, शानाभाऊ सोनवणे, जगदीश बागुल, दिलीप कोळी, नारायण सिरसाठ, संजय शिंदे, चंद्रकांत सोनवणे, किशन सोनवणे, राजेंद्र पवार, मनोज सोनवणे, कविता शिरसाठ, कविता मोरे, सखाराम बिर्‍हाडे, वसंत कोळी, गीतांजली कोळी, शोभाताई ठाकरे, सोनाली आखडमल, प्रभाकर सोनवणे, इशेंद्र ईशी, चतूर देवरे, भास्कर कुवर, पितांबर देवरे, राजेंद्र मंडलिक, भिमाजी कोळी आदी उपस्थित होते. यावेळी वधू-वर व पालक परिचय पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेळावा समितीतर्फे कैलास ईशी यांनी कोळी समाजात साखरपुड्यात वर मुलासाठी घोडा आणण्याची नवीनच प्रथा रूढ होत आहे, समाजाची आर्थिक स्थिती बघता ही प्रस्था समाजातील काही वधू पित्यांना आर्थिक दृष्ट्या योग्य नसल्याने साखरपुड्यात घोडा न आणण्याचा ठराव आला. सर्व समाज बांधवांनी हा ठराव एकमताने मंजूर केला. याला सुरेश जाधव यांनी अनुमोदन दिले. मेळाव्यात 116 युवक-युवतींनी आपला परिचय दिला. या मेळाव्यातून अनेक युवक-युवतींना आपल्या विवाहासाठी अनुरूप जोडीदार शोधण्याची मदत होणार आहे. प्रास्ताविक प्रकाश सोनवणे यांनी केले.

अ‍ॅड. शरदचंद्र जाधव, शानाभाऊ सोनवणे, सुनील सैदाणे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन कैलास ईशी, प्रकाश सोनवणे यांनी केले. मेळावा यशस्वी होण्यासाठी आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे व मेळाव्याचे अध्यक्ष रवि शिरसाठ, निलेश पवार, दिलीप शिरसाठ, अमोल निकुमे, संदीप येळवे, धनराज शिरसाठ, मयूर सोनवणे, विजय कोळी, अमोल नवसारे, भैय्या कोळी, रवि मंडाले, वैशाली महाले, हेमंत सावळे, सागर निकुभे, सतिष आखडमल, जयश्री सिरसाठ, अविनाश शिंदे, राकेश कुवर, हेमराज बोरसे, संजय निकुमे, दादासाहेब येळवे, पावबा कोळी, धनराज शिरसाठ व जिव्हाळा ग्रुप यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com