
धुळे : प्रतिनिधी dhule
रमजान ईद (Ramadan Eid) आणि अक्षय तृतीया (Akshay Tritiya) हे सण एकाच दिवशी येत आहेत. या दोन्ही सणांच्या माध्यमातून प्रत्येकाने एकात्मता आणि एकतेचा संदेश दिला पाहिजे. हे दोन्ही सण सर्वांनी सौहार्दपूर्ण आणि शांततापूर्ण वातावरणात साजरे करावेत. प्रत्येक नागरिकाने कायद्याचे पालन केले पाहिजे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन (Nashik Range) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर (Dr. BG Shekhar) यांनी येथे केले.
(Collector's Office) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा हे अध्यक्षस्थानी होते.
महापौर प्रदीप कर्पे, (Superintendent of Police Praveen Kumar Patil) पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, अपर आयुक्त नितीन कापडणीस, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, महेश जमदाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे आदी उपस्थित होते.
विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.शेखर यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यातील अनेक व्यक्तींनी विधायक कामांच्या माध्यमातून जागतिकस्तरावर नावलौकिक मिळविला आहे. असाच विधायक नावलौकिक वाढवित धुळे जिल्ह्याचा औद्योगिक, आर्थिक विकासासाठी सर्वांनी
प्रयत्न करावेत. सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. सोशल मीडियावरील संदेशांच्या पडताळणीसाठी सायबर पोलिस सेल, मीडिया पोलिस सेल कार्यरत आहेत.
याशिवाय वेगवेगळ्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर पोलिसांचे लक्ष आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. ध्वनी
प्रदूषणबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करावे. नागरिकांच्या काही तक्रारी, अडचणी, शंका असतील, तर त्यांनी पोलिस अधिकारी किंवा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच अनुचित प्रकारांबाबत पोलिसांना माहिती द्यावी. महापौर श्री.कर्पे यांनी सांगितले, धुळे शहरासह जिल्ह्यात सर्वांचेच एकमेकांशी सौहार्दपूर्ण आणि प्रेमाचे संबंध आहेत. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात आगामी काळात विविध सण- उत्सव येत आहेत. प्रत्येकाने परस्परांशी सौहार्दपूर्ण वागावे. विकासाच्या मार्गाने जावून आर्थिक विकास साधावयाचा असेल, तर शांतता आवश्यक आहे. सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा. त्यासाठी स्वत:वर काही बंधने घालून घेतली पाहिजेत. पोलिस अधीक्षक श्री.पाटील यांनी सांगितले, रमजान ईद आणि अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासन खंबीरपणे काम करीत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पोलिस दलाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. समाजातील विघातक प्रवृत्तींवर पोलिस दलाचे सूक्ष्म लक्ष आहे. सायबर सेल, मीडिया सेल, गुप्तचर यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. त्यामुळे प्रत्येकाने विचारपूर्वक कृती केली पाहिजे. ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर समिती गठित करण्यात आली असून पोलिस ठाणेनिहाय प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत कायद्यानुसारच कार्यवाही केली जाईल. यावेळी एम. जी. धिवरे, श्री. सत्तार, मुकुंद कोळवले, हिरामण गवळी, रईस हिंदुस्थानी, राज चव्हाण, आनंद लोंढे आदींनी मनोगत व्यक्त करीत पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी वरीष्ठ पोलिस अधिकारी, नागरिक उपस्थित होते.