बंबचा आणखी नवा कारनामा, परस्पर काढल्या 2400 एफडी

योगेश्वर पतसंस्थेवर छापा 2 कोटी 47 लाखांची रोकड, 210 सौदा पावत्या, शंभर कोरे चेक जप्त
बंबचा आणखी नवा कारनामा, परस्पर काढल्या 2400 एफडी

धुळे Dhule । प्रतिनिधी

अवैध सावकार राजेंद्र बंबचे (Illegal moneylender Rajendra Bomb) नवनवीन कारनामे बाहेर येत आहेत. त्यात आणखी एका कारनाम्याची भर पडली आहे. त्याने परस्पर कर्जदारांच्या कागदपत्रांव्दारे एफडी (FD through borrower documents) काढत त्या वेळोवळी रिन्यु देखील केल्या. हे गुन्हेगारची कृत्यच असल्याचे सांगत देवपूरातील योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या (Yogeshwar Nagari Sahakari Patsanstha) लॉकरमधून (Locker) तब्बल 2 हजार 400 एफडीची (FD) कागदपत्रे, 2 कोटी 47 लाखांची रोकड, 210 सौदा पावत्या, शंभर कोरे चेक, 34 सोन्याचे कॉईन असा मुद्येमाल जप्त (Seizure of goods) करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil) यांनी पत्रपरिषदेत दिली.

अवैध सावकारीप्रकरणात राजेंद्र बंब हा सध्या पोलिस कोठडीत (police custody) आहे. त्याच्या योगेश्वर पतसंस्थेतील (Yogeshwar Nagari Sahakari Patsanstha) सात लॉकरची (Locker) काल तपास यंत्रणेचे झडती घेतली. रात्री उशिरापर्यंत ही कार्यवाही सुरू होती. त्यात 2 कोटी 47 लाखांच रोकड, राजेंद्र बंब याने करुन घेतलेल्या 210 सौदा पावत्या व मुळ खरेदी खत, इतर व्यक्तिच्या नावाच्या बेनामी मुदत ठेवीच्या (एफडी) (FD) 2 हजार 400 पावत्या, 34 सोन्याचे लहान गोलाकार नाणी (प्रत्येकी 4 ग्रॅमची 6 लाख 50 हजार रूपये किंमतीची), सहा परकीय चलन (1 सिंगापूर व पाच मलेशियाच्या), पिडीतांच्या स्वाक्षर्‍या असलेले 100 कोरे चेक असा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

बंब याने एफडी या नागरिकांच्या कादपत्रांचा वापर करत काढल्या आहेत. 7 ते 10 हजारांच्या या एफडी असून एकाच कुुटुंबाच्या व्यक्तींच्या नावाने दहा ते पधंरा एफडी केल्या आहेत. येवढेच नाहीतर त्या वेळोवेळी रिन्यु देखील केल्या. या एफडीची रक्कमेच हिशोब केल्यास दोन कोटीपेक्षा जास्त असल्याचेही पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी सांगितले. सुनंदा केले पतसंस्था, धुळे विकास, शिरपूर, शहादा व जळगाव पिपल्स बँकेतील या एफडी आहेत. तर शहादा पिपल्समध्ये बंबच्या नातेवाईकांच्या एफडी (FD of relatives) आहेत.

आजपर्यंत झालेल्या छापा कारवाई दरम्यान मिळून आलेले सोने- चांदीच्या (Gold- silver jewelry) दागीन्यांची शुध्दता, वजन आणि मुल्यांकनसाठी शासनमान्य मुल्यांकनकर्ता प्रणव बहाळकर यांचे सहकार्य लाभले आहे.

छापा कारवाई पोलिस अधिखक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उप अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, असई हिरालाल ठाकरे, पोलीस हवालदार गयासुद्दीन शेख, भुषण जगताप, रविंद्र शिंपी, मनोज बावीस्कर आणि सावकारांचे सहायक निबंधक तथा उपनिबंधक मनोज चौधरी, राजेंद्र विरकर यांनी संयुक्तपणे केली आहे.

पतसंस्थेच्या संचालकांची चौकशी करणार

बंबच्या लॉकरमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात इतर व्यक्तींच्या नावाच्या एफडी मिळून आल्या. याबाबत पतसंस्थेकडून एफडी धारक व्यक्तीच्या नावाची खात्री का करण्यात आली नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पंतसंस्थांच्या संचालकांची (directors of credit institutions) चौकशी (Inquiry) करण्यात येईल, दोषी आढळल्यास आरोपी देखील केले जाईल, अशी माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली.

पॉलिसीच्या रक्कमेवरही डल्ला

याबरोबरच बंब हा कर्जदाराची एलआयसी पॉलिसी (LIC policy) घेतलेल्या नंतर सरेंडर फार्मवर देखील सह्या घेवून घेत होता. त्यामुळे तो पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यु देखील घेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बंब याने काढलेल्या किती पॉलिसी सरेंडर झाल्या. त्यात कोणकोणत्या किमी रक्कमेच्या होत्या. ही माहिती घेण्यासह ती कर्जदारांची मॅच केली जाईल. यासाठी एलआयसीच्या अधिकार्‍यांनाही बोलविण्यात येणार असल्यााचे एसपींनी सांगितले.

बंबच्या स्थावर मालमत्तेची चौकशी करणार

राजेंद्र बंबच्या स्थावर मालमत्तेची चौकशी (Real Estate Inquiry) करण्यात येणार आहे. त्याने शेगाव, खामगाव यासह इतर ठिकाणच्या बाहेरील मालमत्तेबाबत विशिष्ट कोडवर्ड टाकून ठेवला आहे. तसेच कर्ज घेणार्‍यामधील व्हीआयपी लोकांची नावाबाबत बंबने कोडवर्डचा वापर केला आहे. पोलिसांना तपासात तो असहकार्य करत असून अद्यापही त्याने त्यांच्या जी.पी. फायनान्स कंपनीबाबत (G.P. Finance Company) काहीही सांगितले नाही. दरम्यान आयकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकार्‍यांनी देखील गुन्ह्यातील तपासाची कागदपत्रांची मागणी केली असल्याचेही एसपींनी सांगितले. तसेच गुन्ह्यातील फिर्यादी दुसाणे आणि ताकटे या दोघांची कागदपत्रे देखील आजच्या जप्त मुद्येमालात मिळून आली आहे.

बंबचा भाऊ बेपत्ता

राजेंद्र बंब याचा भाऊ संजय बंब (Brother Sanjay Bomb) याच्या घरातूनही पहिल्या दिवशी गुन्हयाशी संबंधीत कागदपत्रे आणि 12 लाख 9 हजार 400 रुपये रोख असा मुद्येमाल जप्त करण्यात होता. तेव्हा त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. परंतू तो आला नाही. त्यानंतर मात्र तो बेपत्ता झाला (Disappeared) आहे. चौकशीला आला नाही तर त्याला अटक करण्यात येईल, असेही एसपींनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com