आणि म्हणून महिलांनी कान नदीला अर्पण केला साडीचोळीचा आहेर

मालगाव धरणातून सोडलेले पाणी पोहचले, साक्रीकरांची भागणार तहान
 आणि म्हणून महिलांनी कान नदीला अर्पण केला साडीचोळीचा आहेर

साक्री Sakri । प्रतिनिधी

साक्री शहराची जीवनधारा असलेल्या कान नदीत (river Kan) उन्हाळ्यामुळे पाणीसाठा बंद (Water supply closed) होतो. मात्र शहरातील जनतेला पाणी मिळावे यासाठी मालनगाव धरणातून (Malangaon dam) पाणी आरक्षीत केले जाते. हेच पाणी मागील काही दिवसापासून शहरासाठी सोडले होते ते पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीजवळ पोहोचले. यामुळे शहरवासीयांना पाणीपुरवठा (Water supply) करणे शक्य होणार आहे. त्यातून उतराई होण्यासाठी साक्री नगरपंचायतच्या नगराध्यक्ष (Nagar Panchayat) जयश्री पवार ( Mayor Jayashree Pawar) उपनगराध्यक्ष व गटनेते बापूसाहेब गीते, पाणीपुरवठा सभापती रेखा सोनवणे तसेच सर्व नगरसेवकांच्या हस्ते कान नदीला (river Kan) साडी चोळीचा (offered saree) आहेर अर्पण करून पूजा करण्यात आली.

दरवर्षी उन्हाळ्यात शहरातील पाणीपुरवठा (Water supply) करणार्‍या यंत्रणेवर टंचाई अभावी मोठ्या प्रमाणात ताण पडतो. ह्यावर्षी देखील पाणीटंचाई ग्रूहीत धरुन त्यावर उपाययोजना करण्यासाठी नवीन सत्ताधार्‍यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात विधानपरिषदेचे आमदार अमरीश पटेल (MLA Amrish Patel) यांच्या सहकार्याने शहरात गरजेनुसार बोअरवेल देखील घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील जनतेला यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई (Water scarcity) पासून दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

तर दुसरीकडे मालनगाव धरणातून Water scarcity पाण्याचे आवर्तन Water cycle उपलब्ध झाल्यामुळे शहरवासीयांना दैनंदिन व्यवहारासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे काहीअंशी पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.

याप्रसंगी नगरसेवक दीपक वाघ, मनीषा देसले, उज्वला भोसले, उषा पवार, जयश्री पगारिया, अँड्. पूनम शिंदे- काकुस्ते, पाणीपुरवठा अभियंता श्रीकांत फागणेकर, तालुकाध्यक्ष वेडु सोनवणे, शहराध्यक्ष कल्याण भोसले, कार्यालयीन अधीक्षक सुनील चौधरी, प्रभाकर घरटे, अमोल बोरसे, दलित आघाडी शहर प्रमुख अजय लोणखेडे, दिलीपशेठ सोनार, योगेश भामरे, राकेश दहिते, विजय भोसले, आबा सोनवणे, महेंद्र देसले, स्वप्निल भावसार, विनोद पगारिया, अनिल पवार, हेमंत पवार, जगदीश शिंदे, चारुदत्त बोरसे, रंगनाथ भवरे, श्रीकांत कार्ले आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.