... आणि म्हणून धुळे बार असोसिएशनने केला स्टॅप वेंडरांना विरोध

... आणि म्हणून धुळे बार असोसिएशनने केला स्टॅप वेंडरांना विरोध

धुळे । Dhule प्रतिनिधी

जिल्ह्यातील चारही तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील (Deputy Registrar office) स्टॅम्प विक्रेते (Stamp sellers), एजंट यांना दस्त नोंदणीसाठी (diarrhea registration) कोणताही कायदेशीर अधिकार नसतांना (absence of legal authority) ते दस्त लिहून सादर करीत आहेत. ही बाब बेकायदेशीर (Illegal) असून तत्काळ थांबविण्यात यावी. तसेच त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई (Legal action) करण्यात यावी, अन्यथा सर्व वकील आंदोलन करतील असा इशारा धुळे बार असोसिएशनच्या (Dhule Bar Association) वतीने देण्यात आला आहे.

बार असोसिएशनने आज जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून आपली तक्रार नोंदविली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील स्टॅम्प विक्रेत्यांकडे स्टॅम्प विक्रीचा आणि रेव्हीन्यू तिकिट विक्री करण्याचा परवाना आहे. मात्र त्यांना दस्त तयार करणे, दस्त नोंदणीसाठी सादर करणे, त्यावर दस्त तयार करणारा म्हणून सही करणे याबाबतचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. संबंधित स्टॅम्प विक्रेते हे नियमबाह्य दस्त लिहून ते नोंदणी करण्यासाठी सादर करण्याचे बेकायदेशीर कृत्य करीत आहेत. तरी देखील ते दुय्यम निबंधक कार्यालयात बिनदिक्कतपणे वावरत असतात.

मुळात त्यांचे हे कृत्यच नियमबाह्य आहे. याबाबतचे कायदेशीर ज्ञान त्यांना नाही. या सर्व अनागोंदी कारभारामुळे खोटे, चुकेचे दस्त नोंदणी होवून बरेच फौजदारी गुन्हे व दिवाणी वाद वाढीस लागल्याच्या घटना घडत आहेत. अशी प्रकिरणे दाखलही झाली आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयात बायोमॅट्रीक प्रणाली बंद आहे. यामुळे खोटे बनावट अधारकार्ड बनविले जावून बोगस व्यवहारांची नोंद केली जाते.

विशेष म्हणजे दस्त तयार करण्याचा अधिकार नसतांना त्यावर ते दस्त तयार करणारा म्हणून स्वाक्षरी करतात. वास्तविक हे अधिकार कायद्याची पदवी अथवा सनदधारक व्यक्तींमार्फतच होणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यक्तीकडून असे व्यवहार होणे हे बेकायदेशीर असून यामुळे सामान्य नागरिकांच्या होणार्‍या फसवणुकीस व कायदेशीर कृतीस प्रशासन जबाबदार आहे.

त्यामुळे असे प्रकार तत्काळ बंद करण्यात यावे, संबंधितांविरुध्द कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.आर.डी. जोशी, उपाध्यक्ष मधुकर पीसे, सचिव दिनेश गायकवाड, पुरुषोत्तम महाजन, रसिका निकुंभ आदिंनी दिला आहे.

या निवेदनावर बार असोसिएशनच्या वतीने भारती पाटील, शोभा खैरनार, कैलास माळी, संतोष केदार, डी.जी. पाटील, डी.डी. जोशी, जितेंद्र निळे, सुरेश बच्छाव, सुरेश बडगुजर, कैलास माळी, सचिन जाधव, रमाकांत घोडराज यांचीही निवेदन देतांना उपस्थित होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com