अन् बोराडी गाव झाले भारनियमन मुक्त

अन् बोराडी गाव झाले भारनियमन मुक्त

बोराडी Boradi । वार्ताहर

बोराडी ग्राम परिषदेने (Boradi Gram Parishad) माझी वसुंधरा अभियानात (My Vasundhara campaign)-02 व 3 अंतर्गत सहभाग घेतल्यापासून बोराडी गावात ग्रामस्थांनी आपल्या घराच्या छतावर व शेतात सौर ऊर्जेचे पॅनल लावून त्यातून घराला व शेतीला वीज वापरून इतर वीज वितरण कंपनीला देवून बोराडी गाव भारनियमनातून (burden free) मुक्त झाले आहे.

बोराडी गावातील छतावर सुमारे 21 सौर बंब, सौर ऊर्जेवर चालणार्‍या शेतातील दहा विहीर, कुपनलिका सहा, विजेसाठी सौर पॅनल सहा घरांवर लावण्यात आले असून पाणी गरम करण्यासाठी सौर वॉटर बंबचे युनिट बसविले आहे. त्यामुळे पैशांची बचत होते. शिवाय शिल्लक वीज वितरण कंपनीला पुरवुन राष्ट्रीय कामात हातभार लावत आहेत. व पर्यावरणपुरक वातावरण निर्माण होण्यासाठी मदत होत आहे. बोराडीत अनेक नागरिकांनी सौर उर्जेवर चालणारा सौर बंब बसविला आहे. यामुळे वीज, गॅस, लाकुड, रॉकेल, कोळसा इत्यादी ऊर्जासाधनांची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.

बोराडीत वीजबचतसाठी महाराष्ट्र विद्युत मंडळाचा मोठा सौर प्रकल्प आहे. तसेच गावात देखील अनेक नागरिकांनी घरासाठी सौरबंब, शेतीसाठी सौरकृषीपंप, सौरप्रकल्प बसविले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजबचत होत आहे.सौरपंपामुळे शेतकरी बांधव दिवसा शेतात पाणी भरतात त्यामुळे सर्पदंशाचा त्रास सुद्धा कमी झाला आहे. सौरकृषी पंपासाठी शासन सुद्धा मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे.

भारनियमामुळे शेती करणे अवघड झाले होते. शेतात पाणी भरण्यासाठी वेळेवर वीज पुरवठा होत नसल्याने शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येत होती. पण सौरकृषीपंप पॅनल बसविल्यामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिकांना पाणी भरणे होत असल्याने पीक देखील जोमदार येत आहे. व यामुळे शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सौर उपकरणे बसविण्यासाठी धुळे जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, धुळे जिल्हा पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे, सरपंच सुकदेव भिल, ग्रामविकास अधिकारी डी.आर.पेंढारकर व सर्व ग्रामपरिषद सदस्य, पर्यावरण दुत प्रयत्नशील आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com