अन् सदावर्तेनी स्वतःचा टीआरपी वाढवून घेतला

संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा पत्रपरिषदेत आरोप
अन् सदावर्तेनी स्वतःचा टीआरपी वाढवून घेतला
एसटी महामंडळ

धुळे । Dhule । प्रतिनिधी

साडेपाच महिने आंदोलन (ST workers movement) करून देखील एसटी कर्मचार्‍यांच्या हाती काहीच आले नाही हे वांझोटे आंदोलन झाले. चुकीच्या हाती आंदोलन गेले की असेच होते. आंदोलनामुळे कर्मचार्‍यांचे तीन ते आठ लाखांचे नुकसान झाले आहे. एसटी कर्मचार्‍यांचा (ST workers) वापर करून सदावर्तेंनी(sadavarte) स्वतःचा टीआरपी (increased his own TRIP) वाढवून घेतला असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे (Maharashtra State Transport Workers Union) अध्यक्ष संदीप शिंदे (Sandeep Shinde) यांनी पत्रकार परिषदेत केला.

एसटी कर्मचार्‍यांच्या मेळाव्यानिमित्त ते धुळ्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिलीप राजपुत, संतोष वाडीले, विनोद शितोळे, श्री.अकोेलेकर आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना संदीप शिंदे यांनी सांगितले की, सदावर्ते यांनी कर्मचार्‍यांना एकप्रकारे हिप्नॉटीझम (Hypnotism) केले होते. सदावर्ते म्हणतात, मी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाऊन विलीनीकरण मिळवून देणार. परंतू कोणतेही न्यायालय विलीनीकरण देऊ शकत नाही. तो प्रशासकीय मुद्दा असून राज्य सरकार (State Government) ठरवीत असते. आंदोलनामुळे कर्मचार्‍यांचे 3 ते 8 लाखांचे नुकसान झाले आहे. पंरतू आता कर्मचार्‍यांनाही आपली चुक कळाली आहे. आजच्या मेळाव्यात काही कर्मचार्‍यांनी आम्ही चुकीच्या नेतृत्वाखाली गेल्याचे मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान आता त्या आंदोलनात मागे कोण कोण होते, त्यांची नावेही आता समोर येत असून श्री.शिंदे (Sandeep Shinde) यांनी भाजपावरही ( BJP) आरोप केले. आता एसटी कर्मचार्‍यांना राज्य सरकार इतका पगार मिळायलाच हवा, यासाठी लढा देणार आहोत. तसेच आंदोलनामुळे कर्मचार्‍याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी देखील उपाययोजना केल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले. एकतर्फी वेतनाचे हफ्ते आता संपणार आहेत. त्यामुळे वेतनातून मोठी कपात होणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांची 1200 कोटींची थकबाकी मिळविण्यासाठी, संघटना प्रयत्नशील असल्याचेही संजय शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com