अमरिशभाई पटेल यांचा मुंबई विधानभवन येथे शपथविधी समारंभ

अमरिशभाई पटेल यांचा मुंबई विधानभवन येथे शपथविधी समारंभ

शिरपूर - Shirpur

धुळे नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचा मुंबई मंत्रालय, विधानभवन येथे दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते शपथविधी समारंभ पार पडला.

यावेळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार जयकुमार रावल, आमदार विजयकुमार गावित, आमदार काशिराम पावरा, अनेक आमदार, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी 437 पैकी तब्बल 332 मते मिळवून विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळविला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत मोठ्या फरकाने विजयश्री प्राप्त करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला.

मंगळवारी दि. 1 डिसेंबर रोजी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर 437 पैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी 99.31 टक्के मतदान झाले होते. गुरुवारी दि. 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील राजकारणात विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे आमदार अमरिशभाई रसिकलाल पटेल यांना 332 मते व प्रतिस्पर्धी उमेदवार यांना केवळ 98 मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते.

संपूर्ण महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात अष्टपैलू व्यक्तिमत्व, विकासाची दूरदृष्टी असलेले नेते म्हणून आमदार अमरिशभाई पटेल यांच्याकडे पाहिले जाते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com