स्थायीत बनावट लसीकरण प्रमाणपत्र दिल्याचा आरोप

आरोग्याधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा- भाजपाच्या नगरसेवकांची मागणी, सभा स्थगीत
स्थायीत बनावट लसीकरण प्रमाणपत्र दिल्याचा आरोप

धुळे Dhule । प्रतिनिधी

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे (Corona preventive vaccination) बनावट प्रमाणपत्र (Fake certificate)विकण्यात आल्याचा आरोप (Allegations) स्थायीत (Standing) करण्यात आला. यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी (BJP corporators) आरोग्याधिकार्‍यांवर (health officials)गुन्हे (Crimes) दाखल करण्याची मागणी केली. यावरुन सभेत खडाजंगी उडाली. सभेला आयुक्त गैरहजर असल्याने अखेर स्थायीची सभा (Standing meeting) सभापतींनी स्थगित (Postponed by the Speaker) केली.

मनपा स्थायीची सभा सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, कमलेश देवरे, शीतल नवले, सुनिल बैसाणे, नागसेन बोरसे, अमिन पटेल, भारती माळी, पुष्पा बोरासे, किरण कुलेवार, हिना पठाण आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देण्यात आलाचा आरोप सुनिल बैसाणे, शीतल नवरे, नागसेन बोरसे यांनी केला. यावरुन प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.

महापालिकेच्या माध्यमातून बनावट लसीकरण प्रमाणपत्र वाटले असल्याची लेखी तक्रार आयुक्तांकडे केली होती. मात्र कारवाई झाली नाही. मालेगाव महापालिकेने प्रमाणपत्र दिले जात असल्याचे पत्र दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिल्यानंतर चौकशी सुरु केली. मात्र चौकशीत वेळ घालवण्यापेक्षा थेट गुन्हे दाखल करावे. कोरोना लसीकरणाचे खोटे प्रमाणपत्र देवून कोरोनाला नियंत्रण दिले आहे. हा देशद्रोहाचा आणि संघटीत गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्यामुळे चौकशी करावी अशी मागणी श्री. बैसाणे यांनी केली.

आयुक्तांच्या दालनात चौकशीच्या वेळी लसीकरणाचे काम करणार्‍या परिचारिकांनी आपल्यावर डॉ. मोरे यांनी दबाव आणून बनावट प्रमाणपत्र देण्यास भाग पाडल्याचा जबाब दिल्याचे शीतल नवले यांनी सभागृहात सांगितले.

सदस्यांच्या आरोपानंतर सभापती जाधव यांनी आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांना जाब विचारला त्यावेळी मोरे यांनी नोडल अधिकार्‍यांकडे बोट दाखवून बचाव केला. परंतू सभेला आयुक्त नसल्याने सभा स्थगित करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com