जिल्ह्यात रविवारपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार!

जिल्ह्यात रविवारपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार!
बंद

धुळे Dhule । प्रतिनिधी

जिल्ह्यातील सर्व दुकाने दि. 15 ऑगस्टपासून रात्री 9 वाजेपर्यंत August 15 from 9 p.m. सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, दुकानात काम करणार्‍या सर्व व्यवस्थापन व कर्मचार्‍यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या Covid preventive vaccination दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा Collector Jalaj Sharma यांनी दिले आहेत.

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. उपहारगृहे, बारमध्ये प्रवेश करताना, प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल.

उपहारगृह, बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचार्‍यांमध्ये सर्व कर्मचार्‍यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे व ज्या कर्मचार्‍यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह, बारमध्ये काम करु शकतील.

तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. उपहारगृह, बारमध्ये विहीत शारीरिक अंतराचे पालन होईल त्यानुसारच आसन व्यवस्था करावी. उपहारगृहे, बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. पार्सल सेवा 24 तास सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. दुकानात काम करणार्‍या सर्व व्यवस्थापन व कर्मचार्‍यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

जिम्नॅशिअम, योग सेंटर, सलून-स्पा : वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योग सेंटर, सलून-स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.

सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे, ज्या खासगी व औद्योगीक आस्थापनांच्या कर्मचार्‍यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचार्‍यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे, ज्या आस्थापना वरील कर्मचार्‍यांना घरुन काम करणे शक्य आहे, अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचार्‍यांना घरुन काम करण्याची मुभा द्यावी. कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचार्‍यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल, अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करावे.

खासगी कार्यालयांना वेळेच्या व्यवस्थापनासाठी कार्यालये 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र, अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

खुल्या प्रांगणातील, लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेलमधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

खुल्या प्रांगण, लॉनमध्ये होणार्‍या विवाह सोहळ्यास उपस्थितांची प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत राहील. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादेत राहील. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हीडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकार्‍याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.

या निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांवर तसेच संबंधित हॉटेल,कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील) व जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.

आंतरराज्य प्रवास : ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना, बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी 72 तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहील.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र सरकारने तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी, जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, प्रचार, सभा, रॅली, मोर्चे आदी वरील निर्बंध कायम आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com