आदित्य ठाकरे आज धुळ्यात

आदित्य ठाकरे आज धुळ्यात

धुळे Dhule । प्रतिनिधी

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Shiv Sena Yuvapramukh Aaditya Thackeray) हे सद्या महाराष्ट्रभर शिवसंवाद यात्रेच्या ((Shiva dialogue)) माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. या अनुशंगाने आज दि.20 ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे हे धुळ्यात (welcome dhule) येणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील या दौर्‍यात जळगांव जिल्ह्यात पाचोरा, एरंडोल, पारोळा याभागात त्यांचा दौरा होणार असून आज शनिवारी त्यांची शिवसंवाद यात्रा सायंकाळी 4.30 वाजता धुळे जिल्ह्यात दाखल होणार आहे. यात्रेचे पारोळा रोड चौफुली मुंबई-आग्रा महामार्ग येथे शिवसेना धुळे जिल्हा व युवासेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी दुपारी 3.30 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंखे, भगवान करनकाळ, माजी आ.प्रा.शरद पाटील, मंगेश पवार, कैलास पाटील, युवासेनेचे पंकज गोरे, किरण जोंधळे, शानाभाऊ सोनवणे, भरत राजपूत, रावसाहेब देवरे, किशोर वाघ, महानगर प्रमुख धिरज पाटील, डॉ.सुशिल महाजन, भुपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, नरेंद्र परदेशी, प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत गुरव आदींनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com