शिरपूर तालुक्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

या शिक्षकांना मिळाला पुरस्कार
शिरपूर तालुक्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

तऱ्हाडी, ता.शिरपूर वार्ताहर Dhule

शिक्षक दिनानिमित्त मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था व ग्रामीण मराठी पत्रकार संघ, तऱ्हाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार (Ideal Teacher Award) देऊन गौरविण्यात आले.

आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय (RC Patel Secondary School), टेकवाडे येथे पुरस्कार वितरण सोहळा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी डी.पी.बुवा हे होते. तर शिक्षण विस्तार अधिकारी इ. बी. आव्हाड, प्राचार्य के.आर.जोशी, प्राथमिकचे मुख्याध्यापक रवींद्र खोंडे व मराठा पाटील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, उपाध्यक्ष महेंद्र खोंडे, भिका चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिक्षकांना मिळाला पुरस्कार

पुरस्काराच्या निमित्ताने तालुक्यातील आपल्या शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार खंडेराव वसंत बोरसे (ब.ना.कुंभार गुरूजी विद्यालय, वाघाडी), राहुल भागवत पाटील (महात्मा गांधी विद्यालय, मांजरोद) , वासुदेव रामदास चाचरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बभळाज), सरीता किसनराव मुंडे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,जळोद ता.शिरपूर), रवींद्र बापू खोंडे (आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा,टेकवाडे) अरूण आधार चौधरी (आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय,भामपूर), कुंदा बाबुराव उगलमुगले (शासकीय इग्रजी माध्यमिक शाळा, शिरपूर) यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. एस. चव्हाण व सुत्रसंचलन रवींद्र खोंडे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.