लाचखोर त्रिकुट जळगाव एसीबीच्या जाळ्यात

जात वैधता प्रमाणपत्रासाठी मागितली 10 लाखांची लाच, धुळे जात पडताळणीतील लिपिक, समिती सदस्यासह नाशिक जि.प.तील मध्यस्थीचा समावेश
लाचखोर त्रिकुट जळगाव एसीबीच्या जाळ्यात

धुळे : प्रतिनिधी dhule

तब्बल १९ वर्षापासुन वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून तसेच मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीला दोन्ही जात वैधता प्रमाणपत्राचा (Caste Validity Certificate) निकाल देण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्याबाबत निकाल देवूनही दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपीक, समिती सदस्यसह मधस्थी अशा त्रिकुटावर जळगाव एसीबीच्या पथकाने कारवाई केली.

याप्रकरणी तिघांवर धुळे शहर पोलिसात (police) दाखल करण्यात आला आहे. अनिल पाटील (वय ५२, कनिष्ठ लिपीक, अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे वर्ग-३ रा.शिरपुर), निलेश अहीरे (वय ५२, समिती सदस्य, अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे वर्ग-१ रा.नंदुरबार/नाशिक व राजेश ठाकुर (वय- ५२, कनिष्ठ लिपीक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कार्यालय,नाशिक वर्ग-३) अशी तिघां लाच खोरांची नावे आहेत.

फैजपुर (ता.यावल जि.जळगाव) येथील तक्रारदार हे अनुसूचीत जमाती (एस.टी.) प्रवर्गातील असून त्यांनी स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रकरण सादर केलेले होते. मागील १९ वर्षापासुन वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून देखील तक्रारदार यांना त्यांचे स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केले होते.

त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीला सादर दोन्ही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्याबाबत निकाल दिला होता. न्यायालयाची प्रत जात पडताळणी समिती कार्यालय धुळे येथे जमा केल्यानंरही सदर प्रकरणांचा निकाल न दिल्याने तक्रारदार हे कार्यालयातील कनिष्ठ लिपीक

अनिल पाटील यांना भेटले. त्यांनी तक्रारदार यांना दुसऱ्या दिवशी बोलावून घेवून तक्रारदार यांचे व त्यांच्या मुलीचे असे दोन्ही जात वैधता प्रमाणपत्र सदस्य समितीकडून काढून आणुन देण्यासाठी सदस्य समितीतील मेंबरचे नावे सांगुन एका प्रमाणपत्राचे प्रत्येकी ५ लाख रुपये प्रमाणे 2 जात वैधता प्रमाणपत्राचे एकुण १० लाख रुपये लाचेची मागणी केली.

तसेच समिती सदस्य निलेश अहीरे यांनी तक्रारदार यांचे जात वैधता प्रमाणपत्रचे काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे राजेश ठाकुर यास मध्यस्थी टाकून त्यांचे मार्फतीने तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 8 लाख रुपयाची मागणी केली. पैसे ठाकूर यांच्याकडे द्या, असे सांगून स्वतःसाठी पैसे स्वीकारण्याची संमती दिली.

तसेच जात वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी नंदुरबार कार्यालयातील लिपिक खोसे यांना हजार दोन हजार रुपये देण्याबाबत तक्रारदार यांना प्रोत्साहन दिले. तसेच ठाकूर यांनी सदस्य अहिरे यांच्या सांगण्यावरून आठ लाख रुपये हे अहिरे यांच्यासाठी स्वीकारण्याची संमती दर्शवली. तसेच लाच मागणीस प्रोत्साहन दिले. त्यावरून तिघांविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, जाधव, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार रवी घुगे, अशोक अहिरे, पोना बाळु मराठे, सुनील वानखेडे, ईश्वर धनगर, पोकॉ. प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com