पिस्टल बाळगणार्‍या पाणीपुरी विक्रेत्याला अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पिस्टल बाळगणार्‍या पाणीपुरी विक्रेत्याला अटक

धुळे - प्रतिनिधी dhule

विना परवाना पिस्टल (Pistol) बाळगणार्‍या (Panipuri) पाणीपुरी विक्रेत्याला (lcb) स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्टलसह दोन जिवंत काडतूस असा एकुण 22 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

याबाबत पश्‍चिम देवपूर (police) पोलिसात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती (Superintendent of Police Pravin Kumar Patil) पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देवपूरातील नगावबारी परिसरातील प्रियदर्शनी नगरातील

प्लॉट नं. 31 मध्ये राहणारा

आसिफ प्यारेलाल खाटीक हा हा देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगत असुन तो सध्या त्याच्या राहते घरी असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश केले.

पथकाने छापा टाकत संशयीत आसिफ खाटीक याला राहत्या घरुन ताब्यात घेतले. कट्टयाबाबत चौकशी केली असता त्याने घरातील बेडरुममधील लाकडी पंलगाच्या कप्यातुन गावठी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुस काढुन दिले.

20 हजारांचा स्टील बॉडी असलेला एक गावठी कट्टा व त्याच्या 2 हजारांच्या दोन जिवंत काडतुस असा एकुण 22 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुध्द पोकॉ विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरुन देवपुर पोलिसात भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 चे कलम- 3/25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि प्रकाश पाटील, पोहेकॉ संजय पाटील, अशोक पाटील, संदीप सरग, रविंद्र माळी, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com