धुळ्यात नायलॉन मांजा विक्रेत्याला अटक,13 हजाराचा माल जप्त

धुळ्यात नायलॉन मांजा विक्रेत्याला अटक,13 हजाराचा माल जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेची कारवाई

धुळे-प्रतिनिधी dhule

येथील स्थानिक (lcb) गुन्हे अन्वेषन शाखेच्या पथकाने प्रतिबंधीत नायलॉन मांजा (Nylon Dora) विक्रेत्याला अटक केली असून त्याच्याकडून 13 हजारांचा माल जप्त करण्यात आला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरवर्षी नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरीकांना गंभीर दुखापती घडतात. त्याअनुशंगाने आगामी संक्रातीचे दिवसात पतंग उडविण्याकरीता प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या दिले होते. त्याअनुशंगाने काल अकबर चौकात अपना बेकरी समोरील पतंग विक्रेता अताउर रहिमान एकलाख अहमद (वय 27 रा.अपना बेकरी समोर, धुळे) हा प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती मिळाली.

त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनातुन सपोनि प्रकाश पाटील,पोसई योगेश राउत, बाळासाहेब सुर्यवंशी, पोलीस शिपाई कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी यांनी त्याच्या दुकानात (नाव नसलेले) छापा टाकला. तेव्हा शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा मिळुन आला.

त्यात 360 नग छोटे नायलॉन मंजाचे रोल (बोबीन), 33 नग नायलॉन मंजाचे प्लॉस्टीक बंडल, 2 नग नायलॉन मांजाचे सिल्वर रंगाची चकरी असा एकुण 13 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नायलॉन मांजा विक्रेता अताउर रहिमान एकलाख अहमद यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भादंवि.कलम 188 सह पर्यावरण कायदा कलम 5,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com