२५०० रूपयांची लाच भोवली ; लिपीकास अटक

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चाळीसगाव तहसील कार्यालयात कारवाई
२५०० रूपयांची लाच भोवली ; लिपीकास अटक

धुळे । प्रतिनिधी dhule

चाळीसगाव तहसील कार्यालयातील लिपीक दिपक बाबुराव जोंधळे याने प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये पुढील तारीख न देता जामीन मंजूर करण्यास मदत करण्यासाठी 2500 रुपयांची लाच स्वीकारली. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने केली.

तक्रारदार हे वकीली व्यवसाय करीत असून त्यांचा पक्षकार याच्याविरुध्द मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून सीआरपीसी कलम 107 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी चाळीसगाव तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये पुढील तारीख न देता जामीन मंजूर करण्यास मदत करण्याासठी फौजदारी लिपीक दिपक जोंधळे याने तक्रारदाराकडे दि.9 ऑगस्ट रोजी लाचेची मागणी केली. याबाबत धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार देण्यात आली. तक्रारीरीची पडताळणी केली असता लिपीक दिपक जोंधळे हा 2500 रुपयांची लाच स्वीकारतांना चाळीसगाव तहसील कार्यालयात सापडला. त्याच्या विरुध्द चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, रामदास बारेला, भूषण खलाणेकर, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com