सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सराईत गुन्हेगार गजाआड

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सराईत गुन्हेगार गजाआड

धुळे Dhule । प्रतिनिधी

सीसीटीव्ही फुटेजमधील (CCTV footage) हालचाली व शरीरयष्टी वरुन चाळीसगाव रोड पोलीस (Police) ठाण्याच्या पथकाने सराईत गुन्हेगाराला (Criminal) अटक करुन घरफोडी (Burglary) उघडकीस आणली. त्याच्याकडून एक लाख 84 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शहरातील माणिकनगर येथील प्लॉट नं. 76 मध्ये राहणारे महेंद्र बापूराव कापडे (Mahēndra bāpūrāva kāpaḍē)(शिंपी) यांच्या घराचे दि. 10 फेब्रुवारीच्या रात्री 9 ते 11 फेबु्रवारीच्या पहाटे अज्ञात चोरट्याने (Thieves) कुलूप तोडून घरातील चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॅप्स, एक गॅस सिलिंडर, एक पातेले, दोन पितळी पराती, एक तांब्याची कळशी, मोबाईल, चांदी, पितळाचे देवघरातील देव व रोख रक्कम असा 22 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ((Police)) ठाण्यात भादंवि 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेजमधील (CCTV footage) आरोपीची हालचाल व शरीरयष्टीवरुन आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाने अंबिकानगर व जनता सोसायटी भागातून इम्रान उर्फ इम्रान बाचक्या शेख खालीद उर्फ कादीर मोहम्मद व तौसिफ शहा उर्फ फैसल उर्फ सोहेल आरीफ शहा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

इम्रान याने गुन्हा कबुल केल्याची कबुली दिली. तसेच ताब्यात असलेले मुद्देमाल जप्त (Seizure of property) करण्यात आले. त्यात चारचाकी वाहन, एक पितळी पातेले, परात, चांदीचे देवघरातील देव, सिलिंडर, 30 हजार रुपये रोख असा एक लाख 84 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी इम्रान बाचक्या शेख आणि तौसिफ शहा या दोघांना अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास पोना बी.एस. डोईफोडे हे करीत आहेत.

या पथकाने केली कारवाई

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, उपनिरिक्षक नितीन चौधरी, नासीर पठाण, हेकॉ पंकज चव्हाण, कैलास वाघ, पोना एस.जी.कढरे, बाळासाहेब डोईफोडे, पोकॉ हेमंत पवार, स्वप्निल सोनवणे, चेतन झोलेकर, इंद्रजीत वैराट, प्रशांत पाटील यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com