अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले ; धुळ्यातील दाम्पत्य ठार

अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले ; धुळ्यातील दाम्पत्य ठार

धुळे - प्रतिनिधी dhule

धुळे-चाळीसगाव महामार्गावरील (Dhule-Chalisgaon highway) जुनवणे गाव शिवारातील आश्रमशाळेजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले. (accident) त्यात दुचाकीस्वार धुळयातील दाम्पत्य ठार झाले.

याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र हिरामण तमखाने (वय ६१) व कल्पनाबाई रविंद्र तमखाने (वय ५१ रा. धुळे) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. दोघे दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एमएच १८ बीके ३५७१ क्रमांकाच्या दुचाकीने चाळीसगाव रोडने जात होते. त्यादरम्यान जुनवणे शिवारात एकेरी मार्ग सुरू असतांना अज्ञात वाहनावरील चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून त्यांना जबर धडक दिली. त्यात गंभीर जखमी होवून दाम्पत्याचा मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी सायंकाळी झाला.

अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक पळुन गेला. याबाबत प्रशांत छगन भोई (रा.भोई गल्ली, थाळनेर ता.शिरपूर) यांनी धुळे तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनावरील चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय कोठुळे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com