दहा वर्षापासून फरार आरोपीला बेड्या

दहा वर्षापासून फरार आरोपीला बेड्या

धुळे । Dhule । प्रतिनिधी

गुजरात राज्यात (state of Gujarat) गुन्हा (Crime) करून तब्बल दहा वर्षापासून पोलिसांना(police) गुंगारा देणार्‍या फरार आरोपीला (Fugitive accused)अखेर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Local Crime Branch squad) अटक (arrested) केली आहे. काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

गुलाब शिंदे (वय 40 रा. कुसुंबा ता.धुळे) असे त्याचे नाव आहे. तो दारूच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांना (police) हवा होता. मात्र गेल्या दहा वर्षापासून तो पोलिसांना चकवा देत होता. गुजरात पोलिस त्यांच्या मागावर होते.

गुजरातमधील नर्मदा येथील पोलिस अनेक वेळा वॉरंट घेवून आले होते. पंरतू आरोपी मिळत नव्हता. दरम्यान गुलाब शिंदे हा काल कुसुंबा येथे आल्याची माहिती एलसीबीला मिळाली. एलसीबीचे पोना पंकज खैरमोडे, पोकाँ सागर शिर्के यांनी कुसुंबा येथून त्याला ताब्यात घेतले. याबाबत नर्मदा पोलिसांना कळवून आरोपीला त्यांच्या स्वाधिन करण्यात आले.

Related Stories

No stories found.