ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळल्याने युवकाचा जागीच मृत्यू

ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळल्याने युवकाचा जागीच मृत्यू

धुळे - प्रतिनिधी dhule

ट्रॅक्टरसह शेत विहिरीत कोसळल्याने (accident) युवकाचा मृत्यू झाला आहे. सुरेश कुवरसिंग पावरा (वय 19 रा.चिंचपाणी व ह.मु भदाणे ता. शिरपूर) असे मयताचे नाव आहे.

तो काल दि.10 रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास महेंद्र जगतसिंग गिरासे (रा.भटाणे) यांच्या भटाणे शिवारातील शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करीत होते. त्यादरम्यान सुरेश पावरा या ट्रॅक्टरसह शेतातील कोरड्या विहिरीत पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला मृतावस्थेत शेतमालक महेंद्र गिरासे यांनी यांनी शिरपूर कॉटेज रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. याबाबत शिरपूर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकाँ साठे करीत आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com