
धुळे । dhule। प्रतिनिधी
भरधाव ट्रॅक्टरच्या (speeding tractor) धडकेत पादचारी तरूण (young) शेतकरी ठार (killed) झाला आहे. सागर चैत्राम पावरा (वय 20 रा. बोराडी ता. शिरपूर) असे त्याचे नाव आहे.
तो दि. 4 रोजी साडेचार वाजेच्या सुमारास शेतातून काम करून पायी घरी जात होता. त्यादरम्यान दुर्बड्या गावाजवळ मागून भरधाव येणार्या ट्रॅक्टरने त्यास धडक दिली. चाकाखाली आल्याने पावरा हा गंभीर जखमी झाला.
त्याला ट्रॅक्टर चालक किशोर लोटन व आई जिनाबाई यांनी शिरपूर कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असतांनाच पावरा याचा मृत्यू झाला. याबाबत शिरपूर तालुका पोलिसात नोंद झाली आहे.