पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बोरी नदीत बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बोरी नदीत बुडून मृत्यू
बाभुळगाव गंगा

धुळे ।Dhule। प्रतिनिधी

बोरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. काल दुपारी ही घटना घडली. याबाबत तालुका पोलिसात नोंद झाली आहे.

करण राजेंद्र सोनवणे (वय 17 रा. चुडामण नगर, पुरमेपाडा ता. धुळे) असे युवकाचे नाव आहे. तो गावातील चुडामण नगरजवळील स्मशान भुमीला लागून असलेल्या नदीत पोहत असतांना पाण्यात बुडाला. ग्रामस्थांनी पाण्यात शोध घेवून त्याला बाहेर काढले. जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com