गुंगीकारक औषधी विक्री करणारा तरूण जेरबंद

आझादनगर पोलिसांची कारवाई, 38 हजारांचा मुद्देमाल जप्त
गुंगीकारक औषधी विक्री करणारा तरूण जेरबंद

धुळे । dhule प्रतिनिधी

शहरात विनापरवाना गुंगीकारक औषधाची (Anesthetizing drugs)अवैधपणे विक्री करणार्‍या तरूणाला (young man) आझादनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून 38 हजारांच्या 250 औषधी बॉटल जप्त करण्यात आल्या. याबाबत पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. तसेच पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतूक केले.

गुंगीकारक औषधी विक्री करणारा तरूण जेरबंद
धुळे-दादर रेल्वेचा शनिवारपासून शुभारंभ

फारुक ऊर्फ बबल्या अहमद अनिस अहमद (वय 22 रा. शहिद अब्दुल हमीद नगर, धुळे) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी छापा टाकत त्याला ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतली असता बेडरुममध्ये एकूण 3 खोक्यामध्ये कोडेच सिरप कंपनीच्या 100 मिलीच्या एकूण 250 औषधी बॉटल मिळून आल्या.

त्यांची किंमत 38 हजार 500 रूपये इतकी आहे. तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गैर कायदेशीर मार्गाने वरील औषधी चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने रंगेहात मिळून आला. त्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (क), 22 सह भांदवि कलम 328, 276, औषधी व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत कलम 18(सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंगीकारक औषधी विक्री करणारा तरूण जेरबंद
रखरखत्या उन्हात वाघुर नदीला.... अवकाळी पुर !
गुंगीकारक औषधी विक्री करणारा तरूण जेरबंद
घर मालकाचा खून करणार्‍या भाडेकरू मुलास जन्मठेप

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सहा पोलीस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगरचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील व त्यांच्या पथकातील पोहेकॉ योगेश शिरसाठ, प्रकाश माळी, आरीफ सैय्यद, खालीदा सैय्यद, राजु देसले, संदिप कढरे, अतिक शेख, शोएब बेग, योगेश शिंदे, सुशिल शेंडे, अजहर शेख, सिंध्दात मोरे, संतोष घुगे, चालक प्रमोद खैरनार, हरिष गोरे यांच्या पथकाने केली आहे.

गुंगीकारक औषधी विक्री करणारा तरूण जेरबंद
धुळे-साक्री तालुक्याला पावसाने झोडपले
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com