जंगलात व्यापार्‍याला मारहाणीसह केली लूट

जंगलात व्यापार्‍याला मारहाणीसह केली लूट

धुळे Dhule। प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील डोंगराळे गावाच्या (village) जंगलात (forest) पवन चक्कीनजीक (Near Windmill) व्यापार्‍याला (merchant) हाताबुक्क्यांनी व बेल्टने मारहाण (beating) करुन 46 हजारांची लूट (booty) केल्या प्रकरणी तीन जणांविरुध्द (Crime against three persons) निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तराखंड येथील आकाश ईश्वरदयाल अग्रवाल या व्यापार्‍याला कॉपर देतो असे सांगून बोलावून घेतले. श्री. अग्रवाल हे साक्री तालुक्यातील डोंगराळे गावाच्या जंगलात पवन चक्कीनजीक दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता गेले असता तेथे प्रदीप, सिध्दू भोसले आणि एक अनोळखी व्यक्ती सर्वा रा. जामदा यांनी त्यांना हाताबुक्क्यांनी आणि बेल्टने मारहाण केली तसेच त्यांच्याजवळील 46 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हिसकावून घेतला. त्यात पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल, 22 हजार रुपये रोख, 21 हजाराचा मोबाईल असा मुद्देमालाचा समावेश आहे.

तसेच अश्विन तिवारी रा. दिल्ली यांच्याकडून मला सोडविण्यासाठी फोनवर दहा लाख रुपये मागितले. अशी फिर्याद निजामपूर पोलीस ठाण्यात आकाश अग्रवाल यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन भादंवि 394, 341, 385, 34 प्रमाणे प्रदीप, सिध्दू भोसले, एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाचा आढावा सपोनि एच. एल. गायकवाड, पोसई दीपक वारे यांनी घेतला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com