बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षाचा मुलगा ठार

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन
बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षाचा मुलगा ठार

धुळे - dhule

तालुक्यातील नंदाळे बुद्रुक येथे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात चिमुकलीच्या मृत्यूची घटना ताजी असताना आज बोरकुंड येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या कारभारावर रोष व्यक्त करीत शिरूड-बोरकुंड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे गाव हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्वामी दीपक रोकडे (वय ६ रा.बोरकुंड ता.धुळे) असे मयत मुलाचे नाव आहे. तो आज दि. 24 दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात खेळत होता. तेव्हा अचानक बिबट्याने हल्ला करीत त्याला उचलून घेऊन ठार केले. रविवारी देखील नंदाळे बुद्रुक शिवारात हिंस्र प्राण्याने आठ महिन्यांच्या चिमुकलीला शेतात काम करीत असलेल्या आईच्या समोर उचलून घेऊन ठार केले. तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. या घटनेनंतर बोरकुंड परिसरातील नागरिकांनी शिरुड-बोरकुंड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी वनविभाग आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर रोष व्यक्त करण्यात आला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com