सम्राट नगरात मध्यरात्री दुकान फोडले

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद, लाखोंचा मुद्देमाल लंपास, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सम्राट नगरात मध्यरात्री दुकान फोडले

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील सम्राट नगरातील (Samrat Nagar) श्रीकृष्ण सुपर शॉप (Shrikrishna super shop) चोरट्यांनी फोडून (broken by thieves) गल्ल्यातील रोख रक्कम 46 हजार रुपये चिल्लर सह, ड्रायफूट वीस ते पंचवीस हजार रुपयांचे लंपास केले. ही घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात (CCTV cameras) कैद झाली आहे.

शहरातील इंदुमती हाईट्स येथील अपार्टमेंट मध्ये राहणारे शांताराम बन्सीलाल पाटील यांचे श्रीकृष्णा सुपर शॉप दुकान असून या ठिकाणी किराणा वस्तूचे होलसेल दुकान असून रात्री चोरट्याने तीन वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील रोख रक्कम 46 हजार रुपये चिल्लर सह, ड्रायफूट वीस ते पंचवीस हजार रुपयांचे लंपास केले.

ही घटना दुकानात सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून दोन चोरटे दिसून येत असून रोख रकमेसह दुकानातील ड्रायफूट त्याचबरोबर डीओ स्प्रे देखील गोण्यात भरून चोरट्यांनी पोबारा केला आहे.

येथील सिक्युरिटी गार्ड व मालकास ही घटना समजल्याने ते खाली येईस तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याबाबत आज सकाळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वानपथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय.पी.राजपूत, पोलीस उपनिरीक्षक एच. व्ही. हरणे, पोहेकॉ राजू मिस्तरी, धनंजय मोरे,एम.एस.ब्राह्मणे,प्रशांत माळे आदींनी घटना स्थळाचा पंचनामा केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com