जुन्या भांडणातून हाणामारी ; आठ जणांवर गुन्हा

जुन्या भांडणातून हाणामारी ; आठ जणांवर गुन्हा

धुळे - प्रतिनिधी dhule

जुन्या भांडणातून तालुक्यशातील छडवेल गाव शिवारात हाणामारी झाली. ही घटना दि.31 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांवर साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन दत्तात्रय नांद्रे (वय 39 रा.छडवेल) हा त्यांच्या दुचाकीने साक्रीकडे जात होता.

जुन्या भांडणातून हाणामारी ; आठ जणांवर गुन्हा
ऐकावे ते नवलचं ; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पतीच्या उमेदवारी अर्जाची चोरी

त्यादरम्यान त्याला छडवेज पखरून फाट्यावर प्रशांत विनायक नांद्रे याच्यासह चौघांनी हाताबुक्यांनी व लाथांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत जिवे मारण्याचीही धमकी दिली. तसेच काठ्या मारून फेकल्याने सचिन हा जखमी झाला. याबाबत सचिन नांद्रे याने दिलेल्या तक्रारीनुसार प्रशांत नांद्रे, निलेश दौलत नांद्रे, पुष्पक पोपट नांद्रे व मयुर पोपट नांद्रे सर्व (रा. छडवेल) याच्याविरोधात साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोहेकाँ कांबळे हे पुढील तपास करीत आहेत. तर परस्परविरोधात भारती दौलत नांद्रे (वय 42 रा.छडवेल पखरून) यांनी तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सचिन दत्तात्रय नांद्रे, अमोल कन्हैय्यालाल नांद्रे, विनायक शंकर नांद्रे व दिनेश शंकर नांद्रे व इतर सात ते आठ जणांनी मागील भांडणाची कुरातप काढून घरात घुसून पती दौलत नांद्रे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जिवे मारण्याचीही धमकी दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला असून एएसआय भिंगारे तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com