बाजार समितीसाठी विक्रमी 96 टक्के मतदान

मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा: नेते मंडळींनीही तळ ठोकला
बाजार समितीसाठी विक्रमी 96 टक्के मतदान

धुळे । dhule प्रतिनिधी

येथील कृषी बाजार समितीच्या -market committee= दोन जागा बिनविरोध झाल्याने आज उर्वरित 16 जागांसाठी मतदान प्रक्रिया (Voting process)पार पडली. देवपुरातील महाराणा प्रताप हायस्कूल येथील मतदान केंद्रावर आज सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांमध्ये निवडणुकीचा प्रचंड उत्साह दिसून आला. ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग बांधवांनीही मतदान मतदानाचा हक्क बजावला. यंदा मतदानाची टक्केवारीनेही नवा रेकॉर्ड केला. तब्बल 96. 36 टक्के इतके मतदान (turnout) झाले. दरम्यान, रविवारी मतमोजणी होऊन उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार असल्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

बाजार समितीसाठी विक्रमी 96 टक्के मतदान
धुळे-दादर रेल्वेचा शनिवारपासून शुभारंभ.

धुळे बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीत बाळासाहेब भदाणे गट व भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनल आणि महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल यांच्यात चुरशीची लढत होत आहे. माघारीअंती परिवर्तन पॅनलचे महादेव परदेशी व शेतकरी विकास पॅनलचे विजय चिंचाले असे प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यांनतर आज उर्वरित 16 जागांसाठी देवपुरातील महाराणा प्रताप हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. बुथवर महिला व पुरुष मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदान केंद्र परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.

खाजगी वाहनांमधून मतदारांना केंद्रावर आणले जात होते. तसेच रिंगणातील उमेदवारांकडून मतदारांचे स्वागत केले जात होते. तसेच मतदान करण्याचे आवाहन केले जात होते. पहिल्या दोन तासांतच सकाळी 10 वाजेपर्यंत 18.44 टक्के मतदानाची नोंद झाली. तर दुपारी 12 वाजेपर्यंत 53.23 टक्के मतदानाची नोंद झाली. तर दुपारी 2 वाजेपर्यंत 86.94 टक्के मतदान झाले होते. चार वाजेपर्यंत 96. 46 टक्के विक्रमी मतदान झाले.

बाजार समितीसाठी विक्रमी 96 टक्के मतदान
घर मालकाचा खून करणार्‍या भाडेकरू मुलास जन्मठेप
बाजार समितीसाठी विक्रमी 96 टक्के मतदान
धुळे-साक्री तालुक्याला पावसाने झोडपले

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण 3 हजार 590 मतदार आहेत. त्यापैकी 3 हजार 463 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यात सेवा सहकारी मतदार संघातील 1 हजार 569 मतदारांपैकी 1 हजार 546 मतदारांनी मतदान केले. तर ग्रामपंचायत मतदार संघातील 1 हजार 316 पैकी 1 हजार 303 मतदारांनी मतदान केले. तसेच हमाल व तोलारी मतदार संघातील 705 मतदारांपैकी 614 मतदारांनी मतदान केले.

नेते केंद्रावर तळ ठोकून- मतदान केंद्रावर भाजपचे खा.डॉ.सुभाष भामरे, बोरकुंडचे माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे, माजी सभापती सुभाष देवरे, महापौर प्रतिभा चौधरी, ज्येष्ठ नेते प्रा.अरविंद जाधव, वेजिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष महादेव परदेशी, गजेंद्र अंपळकर आदी नेतेमंडळी सकाळपासूनच तळ ठोकून होते. त्यांच्या उपस्थितीमुळे रिंगणातील उमेदवारांचा उत्साह वाढला होता. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनीही या ठिकाणी हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला. तर सुभाष देवरे, प्रा.अरविंद जाधव, अनिकेत विजय पाटील आदींनीही मतदान केले. तसेच महाविकास आघाडीतर्फे आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल रिंगणात असून महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव कोतेकर, गंगाधर माळी, युवराज करनकाळ आदी मतदान केंद्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

बाजार समितीसाठी विक्रमी 96 टक्के मतदान
गुंगीकारक औषधी विक्री करणारा तरूण जेरबंद

अतिउत्साहात धोक्याचा विसर

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत यंदा मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मतदार खाजगी बसेस, क्रूझर आदी वाहनातून येतांना दिसत होता. एक बस हाऊसफुल्ल असल्याने त्यातील एक उत्साही मतदार चक्क खिडकीच्या बाहेर पाय टाकून बसलेला दिसून आला. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मतदान करायचे अन आपल्या उमेदवारांना विजयी करायचे, असा चंगच जनु त्याने बांधलेला होता. मात्र, हा धोकेदायक प्रवास आपल्या जीवावर बेतू शकतो, याची कल्पनाही तो विसरला होता.

पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख तथा आ.कुणाल पाटील यांनी दुपारी महाराणा प्रताप शाळेतील केंद्रात पाहणी केली. तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना मतदान केंद्रात जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप कार्यकत्यांमध्ये बाचाबाची झाली. दोघाही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी लाठीमार केल्याने कार्यकर्त्यांची धावपळ झाली होती. पोलिसांनी दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला होता. हा प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com